spot_img

रेखाताईंच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची सुत्रे कुणाकडे ?

कुणाच्या नावाची चर्चा ?
बुलढाणा, १६ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः माजी आमदार तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षा रेखाताई खेडेकर यांच्या राजीनाम्याने चर्चेला पेव फुटले आहे. काही कारण नसतांना राजीनामा का ? याचीही चर्चा होत आहे. ताई पक्ष बदलत तर नाही ना ! ही शंकाही उपस्थित होत आहे. अर्थात गुड इव्हिनिंग सिटीच्या सुत्रांनुसार पक्षांतर किंवा नाराजी अथवा इतर दुसरे कुठलेही कारण रेखाताईंच्या राजीनाम्यामागे नाही. प्रदेशाध्यक्षपदी नवे नेतृत्व आल्यानंतर संपूर्ण प्रदेशमध्येच अनेक ठिकाणी बदल सुरु असल्यामुळे ‘नवा गडी, नवा राज’ या उक्तीप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातही बदल केले जाणार आहे. नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रेखाताईंच्या तब्येतीचा हवाला दिला परंतु रेखाताईंनी माध्यमांशी बोलतांना ‘त्या ठणठणीत’ असल्याचे सांगितले. रेखाताईंनीसुद्धा मात्र याला दुजोरा दिला आहे की, प्रदेशाध्यक्षपदी नवनियुक्तीनंतर पक्षप्रक्रियेनुसार त्यांनी राजीनामा दिला. पक्षबांधणीसाठी प्रदेशस्तरावर बदलप्रक्रियेला अनुसरून त्यांचा राजीनामा आहे. दरम्यान, आता बुलढाणा राष्ट्रवादीची सुत्रे कुणाच्या हातात सोपविली जातील, ही दूसरी चर्चा पहिल्या चर्चेपेक्षाही अधिक गतिने सुरु आहे. शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतर शरद पवार यांची साथ न सोडणार्‍यांना प्राधान्य राहणार, हे निश्चीत आहे. जे निष्ठावान आहेत आणि पक्षाशी प्रामाणिक आहेत, त्यांची दखल वरिष्ठ पातळीवरून घेतली जाईल, यात शंका नाही. संकटकाळात पक्ष तोलून धरणार्‍या नेत्यांमध्ये कुणाची नांवे आहेत, हे पक्षनेतृत्वाला चांगले माहित आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून मागील दोन वर्षांपासून नरेश शेळके यांचे नांव आघाडीवर होते. परंतु रेखाताईंकडे नेतृत्व सोपविल्यानंतर शेळके यांना कार्याध्यक्षपदी समाधान मानावे लागले होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुप्रियाताईंच्या नेतृत्वात शेळके जिल्हाभर उत्कृष्ट काम करीत आहेत. पक्ष संस्थापक शरद पवार यांना आयुष्यभर साथ देणार्‍यांचा सत्कार करीत ‘शिलेदार निष्ठेचे’ हा पुरस्कार सोहळा त्यांनी यशस्वीपणे केला होता. विशेष म्हणजे त्यांच्या या उपक्रमाचे पक्षाने कौतुक करीत राज्यभर ‘शिलेदार निष्ठेचे’ हा कार्यक्रम राबविण्याच्या इतर जिल्ह्यांना सूचना केल्या होत्या. पक्षीय, राजकीय आणि सामाजिक अशा तिनही योगदानाबाबत नरेश शेळके यांचा नावलौकिक आहे. महत्वाचे म्हणजे महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे स्नेहबंध पक्के आहेत. सर्वसमावेशक नेतृत्व असणार्‍या नरेश शेळके यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सोपविल्यास आश्चर्य वाटायला नको.

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत