spot_img

बोथा घाटात शिवशाहीचे ब्रेक फेल

बुलढाणा, 25 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा खामगाव महामार्गवरील बोथा घाटात अपघाताची घटना घडली आहे. शेगावकडून बुलडण्याच्या दिशेने येणाऱ्या शिवशाही बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे ड्रायव्हरचे गाडी वरील नियंत्रण सुटल्याने बस मागच्या गाडीला जाऊन धडकल्याची घटना घडली आहे. बसची धडक एवढी जोरात होती की यामध्ये मागची गाडी पलटी झाली आहे. या मध्ये मागील गाडीतील प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याठिकाणी उपस्थितांनी तात्काळ मदत करत प्रवशांना बाहेर काढले आहे. गाडी पलटी झाल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळित झाली आहे. पोलिस प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत