धा.बढे, २ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी/विशाल बावस्कर) ः धामणगाव बढे परिसरात ढगफुटीसदृश पावसाने आज हाहाकार केला आहे. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे, रिधोरा खंडोपंत, लिहा, पिंपळगाव देवी आणि कोल्ही गवळी, किन्होळा, ब्राम्हदा, खांडवा, कोर्हाळा, खेडी पान्हेरासह परिसरात आज सकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मागील महिन्यात ही शेतकर्यांचे अतिवृष्टीने मोठयाप्रमाणात नुकसान झाले होते.
हाता तोंडाशी आलेला घास काही मिनिटांच्या पावसाने पाण्याखाली गेला आहे. मका, कापूस, सोयाबीन, केळी आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काही शेतकर्यांनी हरभरा व गहू पिकाची लागवड केली आहे. त्यांच्या शेतातील हरभरा पिकाला उबळ लागली आहे. त्यामुळे खरीप तर गेलाच पण रब्बीचे पिक ही हातातून जाण्याची शेतकर्यांना भिती आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून या संकटग्रस्त शेतकर्यांना योग्य मदत आणि दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व शेतकर्यांकडून केली जात आहे.



