spot_img

येळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा 

 सरपंच दादा लवकर यांना “महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्कार प्रदान”
बुलढाणा, २ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः येळगाव ग्रामपंचायतचे लोकांमधून निवडून आलेले सरंपच दादा लवकर यांना महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. बुलढाणा शहराजवळील महत्वाचे गाव असलेल्या येळगावचे लोकांनी निवडून दिलेले सरपंच दादा लवकर यांनी आपल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात येळगाव ग्रामपंचायतच्या सर्वांगिण विकास करण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला आहे. सरपंच पद हे लोकाभिमुख करून त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. लोकांच्या हाकेला ओव देण्यार्‍या दादा लवकर यांना लोकांनी लोकनेता ही उपाधी दिली आहे. त्यांनी केलेलं सामाजिक कार्य सर्वश्रुत आहे. कुठलेही समस्या असली तरी दादा लवकर त्या ठिकाणी धावून जातात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना २६ ऑक्टोबर रोजी लोणावळा येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे माजी विभागप्रमुख मंगेश चिवटे यांच्या हस्ते त्यांना महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. दादा लवकर यांना महाराष्ट्र ग्रामरत्न पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत