spot_img

तरूणाीला मोबाईल नंबर मागणे भोवले… कोर्टाने सुनावली शिक्षा

बुलढाणा, १३ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः तरूणीला मोबाईल नंबर मागणार्‍या आरोपीला कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. अमित खंडाळे मुख्य न्याय दंडाधिकारी बुलढाणा यांच्या न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आलेल्या तक्रारीवरून  आरोपी शेख रशीद शेख रफिक, रा. जोहर नगर याच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे  कलम ३२४ २९४ भा. दं. वि. नुसार गुन्हा दाखल झाला होता.
१२ मार्च २०१८ रोजी नगरपरिषद कार्यालयाचे जवळ आरोपी हा आठवडी बाजारात केळ्याची गाडी लावत होता. त्याने शेजारी भाजीपाला विकणार्‍या फिर्यादीच्या मुलीकडे तिचा मोबाईल नंबर वाईट उद्देशाने मागितला असता तिने मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्याने आरोपीने तिला अश्लील शिवीगाळ केली व तिथे फिर्यादी मध्यस्थी करताना व समजावून सांगत असताना आरोपीने तिच्या डोक्यात दगड मारून तिला जखमी केली व अश्लील शिवीगाळ केली सदर प्रकरणात  ेमुख्य न्यायदंडाधिकारी बुलढाणा यांच्या न्यायालयासमक्ष सरकार पक्षातर्फे एकूण चार साक्षीदार तपासले गेले ज्यात फिर्यादी स्वतः जखमी तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपास अधिकारी यांच्या पुराव्यावरून सदर गुन्हा सिद्ध झाल्याने मुख्य न्याय दंडाधिकारी अमित खंडाळे बुलढाणा यांच्या न्यायालयाने आरोपीला कलम ३२४ खाली रुपये तीन हजार दंड व कोर्ट उठे पर्यंत शिक्षा तसेच दंड न भरल्यास दहा दिवस साधा कारावास, कलम २९४ खाली दोन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवसांचा साधा कारावास तसेच कोर्ट उठे पर्यंत शिक्षा सुनावली. प्रस्तुत खटल्यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय डोंगरदिवे यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केले तथा संपूर्ण घटल्या दरम्यान हेड कॉन्स्टेबल गजानन मांटे पोलिस स्टेशन बुलढाणा शहर यांनी कामकाज पाहिले सदर खटल्यात सरकार पक्षातर्फे सरकारी वकील हितेश रहाटे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत