बुलढाणा, 25 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : नगर पालिकांच्या निवडणूक प्रचार दिवसेंदिवस जोर धरताना दिसून येत आहे. आज 25 नोव्हेंबर रोजी चिखली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे उमेदवार पंडितराव देशमुख यांच्यासाठी आज सभा घेतली.
तर उद्या 26 नोव्हेंबर रोजी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत. राष्ट्रवादीचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या, 26 नोव्हेंबर रोजी चिखलीत राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रा. निलेश गावंडे यांच्या प्रचारार्थ त्यानंतर खामगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार चेतना संजय शर्मा यांच्या प्राचारासाठी येणार आहे.
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी शिवसेना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुजाताई संजय गायकवाड यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे बुलढाण्यात दुपारी 4.30 वाजताच्या दरम्यान येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राज्यातील सत्ताधारी घटक पक्षांचे मुख्य नेते जिल्ह्यातील नगर पालिका निवडणुकीत रंग भरून जाणार आहे.



