बुलढाणा, 2 जानेवारी(गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाण्यात भाजपमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले आहे. भाजपचे उपजिल्हाध्यक्ष उदय देशपांडे, पद्मनाभ (सोनू) बाहेकर यांच्या पाठोपाठ आता माजी नगरसेवक अरविंद होंडे यांनी सुध्दा राजीनामा दिला आहे. अरविंद होंडे यांनी दिलेल्या राजीमा गेल्या 20 वर्षांपासून भाजप चा प्राथमिक सदस्य असून पक्षाचा शहर सरचिटणीस व 2016 मध्ये नगरपरिषद निवडणुकी मध्ये नगरसेवक व गटनेता म्हणून पक्षाचे निष्ठेने काम केल आहे
दरम्यान शहर भाजप मध्ये असमन्वय व वैचारिक भिन्नता असल्यामुळे या नुकत्याच डिसेंबर 2025 या वर्षी झालेल्या नप सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला आहे.
पक्षाच्या नेत्यांच्या कार्याला कंटाळून नेत्यांच्या हेखेखोरपणाच्या स्वभावामुळे व त्यांच्या स्वभावाला कंटाळून मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे राजीनाम्यात म्हटले आहे. आता हे राजीनामा सत्र कुठपर्यंत जाते ते येणाऱ्या कालावधीत स्पष्ट होईल.