spot_img

ज्ञानगंगा अभयारण्यात मध्यरात्रीच्या सुमारास वाघ दाखल !

जंगल वाचविण्याच्या दृष्टीकोनातून वन्यजीव विभागाचे महत्वाकांक्षी पाऊल

बुलडाणा, 4 जानेवारी (प्रतिनिधी/रणजीतसिंग राजपूत) ः  आनंदाची बातमी आहे.. ज्ञानगंगा अभयारण्यात बिबटे, अस्वल, तडस अशा हिंस्त्र पशुंच्या सोबतीला आता वाघ आला आहे. 2026 या नवीन वर्षाची ही सर्वात मोठी ब्रेकींग असून मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास पुरुष जातीचा पीकेसीटी-1 नावाचा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात देव्हारी आणि बोरखेड-तारापूर जंगलाच्या बाजूने सोडण्यात आला आहे. याठिकाणी बंदीस्त जाळी आहे. विशेष म्हणजे या वाघाने आज सकाळी एक शिकारही केली आहे. तात्पर्य हा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात रूळणार, यात शंका नाही. यापूर्वी सी-वन नावाचा वाघ काही महिनेच ज्ञानगंगा अभयारण्यात राहीला. नंतर तो निघून गेला.
गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार रात्री 2 वाजेपासून पीकेसीटी वन या वाघाला बंदीस्त क्षेत्रात ठेवण्यात आले आहे. पेंच अभयारण्यातून या वाघाला आणले गेले आहे. याचे वय 35 महिने असून तो अजून किशोरवस्थेत आहे. अर्थात याचे मूळ पांढरकवडा व्याघ्र प्रकल्प आहे. फेबु्रवारी मार्च 2023 मध्ये त्याची आई मरण पावलेली आहे. चार ते पाच महिन्याचे बच्चे त्यावेळी मिळाले होते. त्यात एक पुरुष आणि महिला जातीचे बछडे होते. नंतर त्यांना पेंच व्याघ्र प्रकल्पात ठेवले होते. तिकडे दोघेही वाढले. आता 3 वर्षाचे झाल्यानंतर यातील वाघाला ज्ञानगंगामध्ये आणले गेले. वाघीण अजूनही पेंचमध्येच आहे. जवळपास 15 ते 16 तासांचा प्रवास करून वाघ मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाला. त्याला बेशुद्ध करण्यात आले होते. तीन ते चार तासानंतर तो शुद्धीत आला. नंतर त्याला अभयारण्यातील बंदीस्त क्षेत्रात सोडण्यात आले.
तीन तासातच केली पहिली शिकार
वन्यजीव विभागाने पीकेसीटी वन वाघासाठी शिकारीचा बंदोबस्त केला होता. एक हेला त्या ठिकाणी सोडण्यात आला होता, जिथे वाघाला सोडले. सदर बंदीस्त क्षेत्र खूप मोठे आहे. शिकार कुठे आहे, याचा वाघाला पत्ता नव्हता. परंतु पीकेसीटी वनने शिताफीने शिकार शोधली आणि सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास हेल्याचा फडशा पाडला. या घटनेमुळे वन अधिकारी आनंदात आहेत. प्रधान मुख्यवनसंरक्षक एस.एम. रेड्डी यांच्या प्रयत्नामुळे ज्ञानगंगा अभयारण्यात दूसऱ्यांदा वाघ दाखल झाला आहे. पीकेसीटी वन टायगरने शिकार केल्यामुळे त्याला इथले जंगल मानवेल, असा विश्वास वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत