spot_img

बुलढाण्यात नव्या ५ ग्रामपंचायत ः आता संख्या एकुण ८७५

बुलढाणा, २१ जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः जिल्ह्यात एकुण ८७० ग्रामपंचायतींमध्ये आता पाच ग्रामपंचायतींची वाढ झाली यांतील संत सेवालाल महाराज बंजारा-लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत दोन आणि सर्वसाधारण निकषांमध्ये तीन ग्रामपंचायत आहेत. विशेष म्हणजे यासाठीची शासकीय अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये चिखली तालुक्यातील ग्रामपंचायत अंचरवाडीचे विभाजन करून वसंतनगर, मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायत विश्रकवीचे विभाजन करून राजगड, लोणार तालुक्यातील ग्रामपंचायत पार्डाचे विभाजन करून धायफळ, जळगांव जामोद तालुक्यातील रसुलपुर ग्रामपंचायतचे विभाजन करून वायाळ निमखेडी आणि सुनगांव ग्रामपंचायतचे विभाजन करून चालठाणा खुर्द अशा पाच ग्रामपंचायतचा समावेश आहे.
ग्रामपंचायतीसंबंधी दैनंदिन कामे सोईची व्हावीत व मुलभूत सुविधा नागरीकांना त्वरित उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्थानिक ग्रामस्थांचे मागणीनुसार निकषांची पुर्तता होत असलेले पात्र प्रस्ताव बुलडाणा जिल्हा परिषांकडुन शासनास सादर करण्यांत आले होते. आता बुलडाणा जिल्हयाअंतर्गत ग्रामपंचायतीची संख्या ८७० वरुन ८७५ झालेली आहे. नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्या नियमानुसार गठित होतील. या निवडणूका फेब्रुवारीमध्ये होतील. आता त्याठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत.
जळगांव जामोद तालुक्यातील आदिवासी बहुल गावांमधुन वायाळ (निमखेडी) व चालठाणा खुर्द तसेच लोणार तालुक्यातील मुळ ग्रामपंचायत पार्डा पासून २४ कि.मी. अंतरावर असलेल्या धायफळ गावासाठी नवीन ग्रामपंचायत स्थापन झाल्याने तेथील नागरीकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृध्दी योजनेच्या जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व सहअध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचे मार्गदर्शन तसेच समितीचे अशासकीय सदस्य डॉ. प्रशांत गलसिंग राठोड, मेहकर व दिपक शिवसिंग साबळे, तरोडा यांचा पाठपुरावा यामुळे बंजारा तांडा भागासाठी नव्याने वसंतनगर व राजगड हया ग्रामपंचायतीची निर्मिती सुकर झाली आहे. तसेच नवनिर्मितीसाठी परिपुर्ण प्रस्ताव तयार करण्याकामी संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी यांचे महत्वपुर्ण योगदान असल्याचे मत शिवशंकर भारसाकळे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जि.प.बुलडाणा यांनी व्यक्त केले असुन निकषांची पुर्तता होत असलेल्या ग्रामपंचायतीनी अधिक माहितीसाठी व प्रस्ताव सादर करणेसाठी संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत