बुलढाणा, २३ जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ःछत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा यांच्यावतीने महाराष्ट्रातील सर्वात भव्य-दिव्य शिवजयंती सोहळा १९ फेब्रुवारी रोजी दरवर्षी साजरा होत असतो. त्याच सोहळ्याच्या अनुषंगाने बुलढाण्यातील शिवप्रेमीच्या महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन शनिवार २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राजमाता चौकातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर परिसरात करण्यात आले आहे. उद्या होणाऱ्या या बैठकीत शिवजयंती २०२६ च्या अध्यक्ष व सचिवांची निवड होणार असून, कार्यक्रमासंदर्भात नियोजन केल्या जाणार आहे. तरी या बैठकीसाठी बुलढाणा शहरातील शिवप्रेमी अगदी वेळेवर उपस्थित राहावे, अशी विनंती अध्यक्ष/ सचिव/कोषाध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणा २०२५ यांच्यावतीने करण्यात आली आहे.