बुलढाणा, ४ फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजीतदादा पवार यांच्या अस्थिकलशाची कालपासून जिल्हा परिक्रमा सूरू आहे. उद्या, गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी हा अस्थिकलश बुलढाणा येथे आणला जात आहे. सकाळी ९ वाजता जयस्तंभ चौक, गांधी भवनमध्ये या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेता येईल. काल, जिजाऊ जन्मस्थळावरून अस्थिकलशाची जिल्हा परिक्रमा सुरु झाली. लोणार, मेहकर, खामगांव, शेगांव याठिकाणी अस्थिकलश आला. आज इतर तालुक्यांमध्ये परिक्रमा आहे. उद्या, बुलढाणा जिल्हा मुख्यालयी अस्थिकलशाचे दर्शन घेता येईल. स्व. अजीतदादा यांच्या अंत्यसंस्कारात अनेकांना सहभागी होता आले नाही, परंतु त्यांचा अस्थिकलश थेट बुलढाण्यातच येत असल्यामुळे अंतिम दर्शनाची सोय उपलब्ध आहे. अजीतदादा प्रेमींनी अधिकाधिक संख्येने अस्थिकलशाच्या दर्शनासाठी यावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी केले आहे.



