spot_img

मूर्तिजापूर जवळ अपघातात बुलडाणा येथील 2 तरुणांचा मृत्यू

बुलढाणा, 7 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : नागपूरहून लोखंडी पाईप घेऊन येणाऱ्या आयशर वाहनाचा रात्री अमरावती – अकोला राष्ट्रीय महामार्गावर मूर्तीजापुर तालुक्यातील कुरम गावाजवळ अपघात झाला असून कॅबिनमध्ये अडकून बुलडाणा येथील चालक व क्लीनर या दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शहरात शोकळा पसरली आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलडाणा येथील जोहर नगर भागात राहणारे अनीसोद्दीन रफीयोद्दीन काझी वय 40 वर्ष आणि रेहान नाजिम पठाण वय 22 वर्षे दोघेही नागपूर येथून आपल्या आयशर वाहनात लोखंडी पाईप घेऊन छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने निघाले होते. त्यादरम्यान रात्री 12 ते 1 वाजेच्या दरम्यान कुरम,ता.मूर्तिजापुर, जि.अकोला येथे त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. आयशर वाहन रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात जाऊन धडकल्याने वाहणातील पूर्ण लोखंडी पाईप केबिनवर धडकले आणि कॅबिन मधील दोन्ही जण दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात कसा घडला हे अद्याप पर्यंत समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.आज शनिवारी दुपारी वाहनातील लोखंडी पाईप हटविण्याचे काम सुरू होते.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत