spot_img

बुलढाणा हादरले !!आठव्या वर्गातील नमन आत्महत्या कसा करेल ?? 

बुलढाणा, 11 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : आई धावडा येथील आश्रम शाळेवर शिक्षिका… वडिल वडोद तांगडा (मासरूळ जवळ) शिक्षक… शाळेची ट्रिप घेऊन तीन दिवसांपासून बाहेर गेलेले… आई नेहमीप्रमाणे सकाळीच शाळेवर जाण्यासाठी निघाली…त्याचवेळेला आठव्या वर्गातला नमन ट्युशनला जाण्याच्या तयारीत होता…. आईने नमनला छानशी मिठी मारली… नमनही हसत आईला बिलगला… त्यावेळेस नमनच्या चेहऱ्यावर आईला असे काहीच जाणवले नाही की, गोड हसणारा आणि आनंदाने मिठी मारणारा नमन तीन तासानंतर मृत्यूला मिठी मारलेला दिसेल…. घरात कोणीही नसताना आठव्या वर्गात शिकणाऱ्या नमन अरुण राऊतने गळफास लावून आपले आयुष्य संपवले. अभ्यासाच्या खोलीत छताला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला. घरात सर्व सुख वस्तु असताना, इतर कुठलेही प्रेशर नसताना इतक्या कमी वयात कुणी मुलगा कसा काय आत्महत्या करू शकतो? या प्रश्नाने अनेकांना हादरवून सोडले आहे. त्यामुळे हे खरंच आत्महत्या आहे की दुसरं काही? अशी शंका आहे काहीजण व्यक्त करीत आहेत. नमन भारत विद्यालयात शिकत होता. त्याचे वडील अरुण राऊत हे वडोद तांगडा येथे शिक्षक आहेत. तर त्याची आई मंगला पालकर-राऊत धावडा येथील आश्रम शाळेवर सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. हा सुखी परिवार बुलढाण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागील छत्रपती नगर भागात राहतो. वडील शाळेतल्या मुलांची ट्रिप घेऊन बाहेरगावी गेलेले होते तर आई सुद्धा सकाळी धावडा येथे गेलेली होती. नमन सकाळी ट्युशनला जाऊन दहा वाजता घरी परतला होता. पण तो शाळेत गेला नाही. शाळेत युनिट टेस्ट असून सुद्धा नमन का आला नाही म्हणून नमन चा वर्ग शिक्षकांनी जेव्हा त्याच्या वडिलांना फोन केला तेव्हा अरुण राऊत यांनी नमनला बरेच कॉल केले पण त्याने ते उचलले नाही… नंतर राऊत यांनी शेजारच्यांना कॉल करून घरी पाठवले, तेव्हा नमनचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत लटकलेला होता. नमनचा मृत्यू कशामुळे झाला? त्याने खरंच फाशी घेतली का? आत्महत्या करीत असताना नमनने आतून दरवाजा का लावला नव्हता? असे काही प्रश्न सध्यातरी उपस्थित होत आहेत. त्याच्या मृत्यूवर त्याचे मित्र आणि त्याचे शिक्षकही आश्चर्य व्यक्त करीत आहेत. त्याच्या आई वडील आणि मोठा भाऊ धायमोकलून रडत आहेत. त्याचा मित्रपरिवार आणि शिक्षकांना तर जबर धक्का बसला आहे. थोड्या वेळानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याचा मृत्यू झाला की त्याने आत्महत्या केली यामागील खरे कारण समोर येणे गरजेचे आहे. कारण या घटनेने अनेक पालकांना हादरवून सोडलेले आहेत.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत