spot_img

ज्ञानगंगातील धुरंधरचा व्हॅलेंटाईन डे कोरडाच ! पीकेटी७सीपी१ वाघाला वाघिणीची प्रतिक्षा

पीकेटी७सीपी१ वाघाला वाघिणीची प्रतिक्षा

बुलढाणा, १३ फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः अभिनेता रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग अर्थात धुरंधरला एलीना (सारा अर्जुन) नावाची प्रेयसी आहे. पण ज्ञानगंगा अभयारण्यात मागील महिन्यात दाखल झालेल्या पीकेटी७सीपी१ या वाघाला अद्यापही जोडीदार मिळालेली नाही. त्यामुळे ज्ञानगंगामधील धुरंधरचा व्हॅलेंटाईन डे कोरडाच जाणार आहे. या धुरंधरसाठी तोच दिवस व्हॅलेंटाईन डे असेल, ज्या दिवशी ज्ञानगंगा अभयारण्यात वाघीणीची ‘एन्ट्री’ होईल.
प्राण्यांमध्ये रोझ डे, चॉकलेट डे, प्रॉमीस डे वगैरे नसतात.. पण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, आपलं आणि प्राण्यांचंही सेम असतं ! ईश्वराने जेव्हढेही जीव या पृथ्वीतलावर निर्माण केले आहेत, त्यांच्यात अडीच अक्षरांचे दोन शब्द सोबतच अंतर्भूत केले आहेत. एक म्हणजे ‘प्राण’ आणि दूसरा म्हणजे ‘प्रेम’ ! आपल्यात जशी प्रेमभावना आहे, तशी प्राण्यांमध्येही आहे.. दिल उनका भी धडकता है.. कारण प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे आहे !
या व्यवहारवादी जगात नियम, शिस्त आणि साधनशुचिता, लोकलाज अशा अनेक बाबींमुळे माणूस प्रेम करतांना किंवा व्यक्त करतांना मर्यादेत राहून करतो. प्राण्यांचं तसं नसतं.. निसर्गदत्त भावनांसह ते आपल्या जोडीदारावर प्रेम करतात.. वाघांमध्ये वाघीणीसाठी रक्तरंजीत संघर्ष होतो. जो जिंकतो, वाघीण त्याची असते. वाघांची संख्या कमी असण्याचेही ते एक कारण आहे. प्रेयसीसाठी संघर्ष करण्याची मानसिकता माणसांमध्ये हल्ली दिसत नाही. ‘तू नहीं तो और सही, और नहीं तो और सही’, या प्रमाणे अनेकांचे प्रेम बदलत राहते. निश्चीतच अशांना व्हॅलेंटाईन डे चे महत्व नसते.. हृदयाने हृदयावर, आत्म्याने आत्म्यावर प्रेम करणार्‍यांसाठी व्हॅॅलेंटाईन डे आहे. हाच व्हॅलेंटाईन डे मात्र ज्ञानगंगामधील धुरंधरसाठी कोरडाठण्ण असणार आहे.

वाघीण येणार पण कधी ? वाचा
पीकेटी७ वाघाची जोडीदार येणार यात शंका नाही. मागच्या महिन्यात ४ जानेवारी रोजी त्याची ज्ञानगंगामध्ये एन्ट्री झाली. त्याने आल्याबरोबर शिकारीला सुरुवात केली. खामगांवच्या माटरगांव जंगलापर्यंत तो फिरून आला. मागील आठवड्यात तो पलढगच्या जंगलक्षेत्रातही फिरला. आता तो दोन दिवसांपासून ज्ञानगंगाच्या बुलढाणा क्षेत्रात संचार करत आहे. तो आता स्थिरावला आहे. त्याला शिकारही चांगली जमते पण प्रेम करता येते की नाही, याची चाचपणी अजून व्हायची आहे. धुरंधर तरणाबांड आहे. त्याचे वय ३ वर्ष ८ महिने आहे. चार वर्षाचा वाघ आणि साडे तीन वर्षाची वाघीण जीवोत्पादन करण्यासाठी सक्षम असतात. वन्यजीव अधिकारी प्रकाश सावळेे यांनी गुड इव्हिनिंग सिटीला संागितले की, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी पीकेटी७ साठी वाघीण आणली जाणार आहे. जी वाघीण आणली जाईल, तिच्यासाठी संघर्षाची गरज पडणार नाही. कारण धुरंधर एकमेव वाघ या अभयारण्यात आहे. श्री सावळे यांनी आनंदाची बातमी दिली खरी पण १४ फेब्रुवारीच्या व्हॅलेंटाईन डे निमित्ताने जर वाघीण आली असती, तर प्राणीमित्रांना अधिक आनंद झाला असता. असो, जेव्हा ती वाघीण येईल, तेव्हा तिचे नांव एलीना (धुरंधरची प्रेयसी) ठेवायचे का? हा एक प्रश्न असेल आणि दूूसरा म्हणजे हा धुरंधर आपल्या एलीनाला प्रपोझ कसा करेल ?

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत