spot_img

गव्हाला पाणी देण्यासाठी गेला आणि त्याचा जीवच गेला..

💥💥💥 *गुड इव्हिनिंग सिटी ब्रेकिंग*

बुलढाणा, 16 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : दुधा गावनजिक ग्राम ढसाळवाडीच्या एका शेतकऱ्याचा मृतदेह त्याचाच शेतात आढळला. उंबरखेड शिवारातील आपल्या शेतात पाणी देण्यासाठी संतोष दगडू दळवी (वय 45) दुपारच्या सुमारास एकटेच गेले होते. बराच वेळ होऊनही घरी न परतल्यामुळे आणि त्यांच्याशी मोबाईलवर ही संपर्क होऊ न शकल्यामुळे त्यांना शोधण्यासाठी जेव्हा काहीजण शेतात गेले तेव्हा संतोष दळवी मृतावस्थेत आढळले. चेहऱ्यावर जखमा तर हातपाय वाकडे होते. धाड पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दळवी यांचा मृत्यू कशामुळे झाला याविषयी चर्चेला उधाण आले असतानाच त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, दळवी मिरगीच्या बिमारीने ग्रस्त होते आणि मिरगीच्या अटॅक मुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई पत्नी आणि दोन मुलांचा परिवार आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत