spot_img

कोषागार मधील तिघेही लाचखोर आज न्यायालयासमोर…

◾ बघा काय झाले न्यायालयात?? कोठडी की जेल?

बुलढाणा, 28 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : पतिची पेन्शन पत्नीच्या नावे करण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेतांना अप्पर कोषागार अधिकारी आणि दोन लिपिकांना काल रंगेहात पकडण्यात आले होते. तिन्ही आरोपींच्या वतीने पोलिस कोठडी मिळू नये म्हणून प्रयत्न करण्यात आले परंतु सरकारी पक्षाच्या वतीने जोरदार युक्तिवादामुळे न्यायालयाने या तिघांनाही दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट वसंत भटकर यांच्या मार्गदर्शनामध्ये एडवोकेट संतोष खत्री यांनी न्यायालयामध्ये युक्तिवाद केला.

बुलढाणा पोलीस विभागात कार्यरत असलेले शेगाव येथील सेवानिवृत्त कर्मचारी हे मे 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले त्यानंतर त्यांचे मे 2025 मध्ये निधन झाले पतीची पेन्शन पत्नीचे नावे करण्यासाठी ऑक्टोंबर 2025 मध्ये अर्ज केला होता तेव्हापासून दिनांक 26 फेब्रुवारी 2026 पर्यंतही पेन्शन केस मंजूर करण्यात आली नाही तब्बल पाच महिन्याच्या कालावधीमध्ये पेन्शनच्या फाईल मध्ये विविध त्रुटी काढून यांना त्या कारणामुळे पेन्शन फाईल परत पाठविण्यात येत होती. यासंदर्भात जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयातील पेन्शन केसशी संबंधित असलेल्या लिपिकाशी दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी आजारी आईसह संपर्क केला यावेळी संबंधित लिपिकाने आईला बाहेर जाण्यास सांगून मुलाकडे 20 हजार रुपयाची लाचेची मागणी केली मात्र आर्थिक परिस्थिती आईचे आजारपण यामुळे संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांची लाचेची मागणी पूर्ण करण्यास प्रारंभी असमर्थता दर्शविली त्यानंतर तडजोडी आणती प्रारंभी पंधरा हजार रुपये देण्याचे निश्चित झाले त्यानंतर पेन्शन केस मंजूर झाल्यावर उर्वरित पाच हजार रुपये देण्यात येईल असे ठरले त्यानुसार सेवानिवृत्त मृत पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलाने बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी संपर्क करून सविस्तर तक्रार दिली

बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सरकारी पंचा समक्ष दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी पडताळणी केली यावेळी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा कोषागार कार्यालयात अप्पर कोषागार अधिकारी प्रवीण मोंढे, कनिष्ठ लेखापाल विनोद घट्टे व कनिष्ठ लिपिक जीवन काळे या तिघांनी एकत्रितपणे सेवानिवृत्त मृत पोलीस कर्मचारी यांच्या मुलाकडून पंधरा हजार रुपयाची लाच स्वीकारली याचवेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलढाणा पथकाने या तिघांनाही लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. या तिघां विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 च्या विविध कलमा अंतर्गत बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ही बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक भागाजी चोरमले यांच्या नेतृत्वात यशस्वी करण्यात आली होती.

आज तीनही आरोपींना न्यायाधीश श्री संतांनी यांच्या कोर्टात उपस्थित करण्यात आले होते. अँटी करप्शन ब्युरो ने पोलीस कोठडीची मागणी केली परंतु सरकारी पक्षाच्या वतीने आरोपींच्या वकिलाचा युक्तिवाद जोरदार कडून करण्यात आला आणि तीनही आरोपींची न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत