spot_img

कचरा टाकणार्‍यांवर राहणार सिसिटीव्हीची करडी नजर

हाजीमलंगपासून ते येळगांवपर्यंत रस्त्यावरच्या घाणकचर्‍यावर ग्रामपंचायतचा उपाय

बुलढाणा, ६ मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) ः चहूबाजूंनी डोंगरदर्‍यांनी घेरलेले बुलढाणा शहर निसर्गाचं अलौकिक लेणं आहे.. परंतु या शहरात कुठल्याही बाजूने प्रवेश करणार्‍यांना दृष्टीक्षेपात पडतो तो घाणकचरा ! येळगांव फाट्यापासून ते पुढे हाजीमलंग दर्गा पर्यंत राज्य महामार्गाच्या दुतर्फा कचराच कचरा आढळून येतो. सागवन, येळगांव तसेच नांद्राकोळीकडून धाड नाका चढून शहरात प्रवेश करतांनाही असाच कचरा सर्वत्र आहे. विनंती, विनवणी करूनही अज्ञात लोकांकडून कचरा टाकण्याचे प्रकार सुरुच आहे. हे अज्ञात कोण, हे स्पष्टपणे कळण्यासाठी येळगांव आणि माळविहीर ग्रामपंचायत प्रशासनाने महत्वाचे पाऊल उचलले असून हाजी मलंग दर्गाहपासून ते येळगांव फाट्यापर्यंत ६ सिसिटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. कचरा टाकणार्‍यांवर सिसिटीव्हीचे डोळे लक्ष ठेवून असणार आहेत. केवळ लक्षच नाही तर जो आढळला त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
बुलढाण्यात कुठल्याही मार्गाने प्रवेश करतांना रूमालाने नाक दाबून शहरात यावे लागते. याचे कारण म्हणजे रस्त्यावरच टाकण्यात येणारा कचरा.. शहराच्या हद्दवाढीला विरोध करण्यासाठी गेलेल्या येळगांव, सागवन, माळविहीर, सुंदरखेडच्या आंदोलनकर्त्यांना याबाबत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी कचर्‍याबाबत जाब विचारला होता. हा कचरा शहरातील लोक ग्रामपंचायत हद्दीत आणून टाकत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांना काहींनी संागितले होते. कचर्‍यामुळे शहराचे विद्रु    पीकरण होत आहे, यात शंक नाही. चिखली मार्गावर बियर बार आहेत. व्हेज-नॉनव्हेजच्या हॉटेल आहेत. फेकलेल्या कचर्‍यामध्ये मांसाचे तुकडे, सडलेले अन्न, बायोमेडीकल वेस्ट इत्यादीही आढळले. विविध स्तरावर प्रयत्न करूनही कचरा टाकणे सुरुच असल्यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासनाने सिसिटीव्ही कॅमेर्‍यांचा उपाय काढला आहे. वृंदावन नगर, एमएसईबी पॉवर हाऊस, शाम ढाबा परिसर अशा तिन ठिकाणी प्रत्येकी दोन सोलर सिसिटीव्ही लावण्यात आले असून कचरा टाकतांना जो कुणी आढळेल त्याच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत मिळत आहेत.

‘‘ग्रामविकास अधिकारी सचिन जाधव यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सांगितले की, प्रशासनाने एक बॅनर लावून कचरा न टाकण्याची विनंती केली आहे. याला जर कुणी जुमानत नसेल तर कारवाईशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही. कारवाई करतांना कुणाचीही हयगय केली जाणार नाही, असा इशाराही श्री जाधव यांनी दिला.’’
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत