spot_img

बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राजमाता जिजाऊंचे नाव?

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची लक्षवेधक मागणी

बुलढाणा, 10 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावरून मतमतांतरे बघायला मिळत आहे. आमदार संजय गायकवाड यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाची मागणी केली होती. तर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी केली परंतु बारामती येथील महाविद्यालयास अजितदादांचे नाव देण्यात आले आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय आयुष व आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांनी राजमाता जिजाऊंचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ना.जाधव यांनी एका महिन्यापूर्वी म्हणजे ३१ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. मागणीच्या तीन दिवसांपूर्वी अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झालेले होते. ना. जाधव यांनी सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, बुलढाणा येथील ‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला’ स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून विनंती केली.
​बुलढाणा जिल्हा हे जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान आहे. त्यांच्या नावाने हे आरोग्य मंदिर उभे राहणे हा केवळ जिल्ह्याचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा सुद्धा गौरव असेल. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जिजाऊंच्या आदर्शातून समाजसेवा करण्याची प्रेरणा मिळेल, असे नमूद करीत मुख्यमंत्री महोदय या जनभावनेचा नक्कीच सकारात्मक विचार करतील, अशी मला खात्री असल्याचा विश्वास ना.जाधव यांनी व्यक्त केला आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत