spot_img

सिलें‘डर’ का माहौल ! विद्यार्थ्यांच्या मेसही बंद

स्पर्धा परीक्षा तसेच विविध महाविद्यालयांचे अनेक विद्यार्थी गावी परतण्याच्या मार्गावर

बुलढाणा, १७ मार्च (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत): युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने ५० टक्के खाणावळी बंद पडल्याने अनेकांचे ‘वांदे’ निर्माण झाले आहेत. याची सर्वात मोठी झळ मात्र विद्यार्थी वर्गाला बसत आहे. मेस-खाणावळी बंद होत असल्याने स्पर्धा परीक्षाधारक विद्यार्थ्यांची उपासमार होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना ऐन परीक्षांच्या काळात गावी जाण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातच जेवणाचे दर वाढविल्याने विद्यार्थ्यांचे आर्थिक गणितसुद्धा कोलमडले आहे. जास्तीचे पैसे दिले तरी पोटभर अन्न मिळत नाही. त्यामुळे पुढील आठ दिवसांत परिस्थितीत सुधारणा झाली नाही, तर शहरातील अनेक अभ्यासिका रिकाम्या होतील, अशी भिती मेस व अभ्यासिका चालकांनी व्यक्त केली. कॉंग्रेस नेते संदीप शेळके यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या घरगुती मेस तथा खाणावळींना कार्रवाईतून वगळले पाहीजे, असे मत व्यक्त केले आहे.
सध्या पोलीस भरतीची लेखी परीक्षा सुरू असल्यामुळे बुलढाणा शहरात शेकडो विद्यार्थी तयारी करीत आहे. परंतु त्यांच्या समोर मेस बंद आव्हानच उभे ठाकले आहे. बुलढाण्यात स्पर्धा परीक्षाधारक विद्यार्थ्यांसाठी ठिकठिकाणी अभ्यासिका चालवल्या जातात. खासकरून चिंचोले चौकाचौकात मोठ्या अभ्यासिका आहेत. एलपीजी गॅसचा पुरवठा नियमित होत नसल्याने हॉटेल, खाणावळींवर मोठे संकट उभे राहिले. गॅस मिळत नसल्याने जेवणाच्या पदार्थांमध्ये कपात करण्यात येत आहे. तसेच काही ठिकाणी दर वाढविण्यात आले आहेत. बुलढाण्या बाहेरील विद्यार्थी मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. बहुतांश विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे. वाढत्या महागाईने सध्या पुण्यात राहणे मुळात कठीण झाले आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत भर पडल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. परीक्षेच्या काळात एक-एक मिनिट महत्त्वाचा असतो. परंतु, या विद्यार्थ्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गॅसचा पुरवठा सुरळीत होईल की नाही, याची शाश्‍वती नसल्याने पुढील आठ दिवस महत्त्वाचे आहेत. या काळात परिस्थितीत बदल झाला नाही, तर गावाला जाण्याशिवाय विद्यार्थ्यांकडे पर्याय उरलेला नाही. एमपीएससी पुढील दिवाळीपर्यंत विविध परीक्षा आहेत. परीक्षेच्या तयारीत विद्यार्थी गुंतले असताना हे संकट उभे ठाकले आहे. पोटात अन्न नसेल तर अभ्यासात मन लागणार नाही, याची विद्यार्थ्यांना जाणीव आहे. महागाईमुळे बुलढाण्यात राहणे परवडणारे नाही. त्यामुळे आठ दिवस प्रतीक्षा करून सर्वकाही सुरळीत होईल, अशी आशा विद्यार्थ्यांना आहे. महागाईमुळे बहुतांश विद्यार्थी एक वेळाच जेवतात. तर, काही विद्यार्थी ङ्गक्त नाश्ता करतात. परंतु, अनेक हॉटेल्समध्ये नाश्ता बंद झाला आहे. त्यामुळे परिस्थिती भीषण बनली आहे.
बुलढाणा शहरातील चिंचोले चौक परिसरातील चौपाटी व संगम चौकातील चौपाटी वरच्या लघु व्यवसायिकांना याचा मोठा ङ्गटका बसला आहे.चौकट प्रशासनाच्या धाडी मुळे हॉटेल व मेस व्यवसाय बंद बुलढाणा शहरात दोन दिवसांपूर्वी तहसिलदारांच्या पथकाने कारवाई केल्यामुळे हॉटेल व मेस चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस भरती, तलाठी भरती, एमपीएससी व विविध स्पर्धा परिक्षांचे तसेच बुलढाणा शहरात असलेल्या विविध महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील व इतर जिल्ह्यातून आले आहेत. त्यांनी बुलढाणा शहरात मेस लावली आहे. व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही आणि घरगुती सिलेंडर लावले तर धाडी पडल्यानंतर कारवाई सामोरे जावे लागत असल्याने अनेक हॉटेल व मेस चालकांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. तरी प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन यामधून सुवर्णमध्य काढला पाहिजे.

विद्यार्थ्यांचा विचार व्हावा ः संदीप शेळके
कॉंग्रेस नेते संदीप शेळके यांनी गुड इव्हिनिंग सिटीला आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, कारवाई कुठलीही असो, त्यामागे जनतेचे हित हाच उद्देश्य असला पाहीजे. सामान्य जनता जर भरडली जात असेल तर अशी कारवाई अन्यायकारक आहे. जर प्रशासनाच्या कारवाईतून विद्यार्थ्यांची उपासमार होत असेल, तर अशी कारवाई काय कामाची! घरगुती मेस किंवा खाणावळीविरोधात कारवाई करण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था केली पाहीजे. जिथे विद्यार्थी आहेत, त्याठिकाणची चौकशी करून कारवाई टाळली पाहीजे, असेही मत शेळके यांनी व्यक्त केले आहे.
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत