spot_img

धनगर उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडेंच्या सासऱ्यांवर बुलढाण्यात अंत्यसंस्कार

◾ उपोषण अवस्थेतच दीपक बोऱ्हाडे येणार
◾ मनोज जरांगेही येण्याची शक्यता

बुलढाणा, 26 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या अंमलबजावण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले दीपक बोऱ्हाडे यांचे सासरे रामराव होळकर यांनी आत्महत्या केल्याची दुखद घटना घडली. दीपक बोऱ्हाडे यांच्या घरीच 25 मार्च रोजी दुपारी त्यांनी गळफास लाऊन जीवन संपवलं. ते 78 वर्षाचे होते, त्यांच्या आत्महत्येमुळे कुटुंब आणि नातेवाईकांना धक्का बसला असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण दीपक बोऱ्हाडे यांची उपोषणादरम्यान खालावत चाललेली तब्येत बघवत नसल्याने होळकर यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा गावात सुरू आहे. होळकर कुटुंब बुलढाणा शहरातील जिजामाता नगर परिसरात असलेल्या रणजीत अपार्टमेंट जवळ वास्तव्यास होते. दीपक बोऱ्हाडे हे गेल्या 10 दिवसांपासून मुंबईमध्ये उपोषणाला बसले आहेत. राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा लढ तीव्रपणे सुरू असताना दुसरीकडे ओबीसी बचाव आंदोलनासाठी धनगर समाजाच्या लक्ष्मण हाके आणि दीपक बोऱ्हाडे यांनीही उपोषण केले होते. जालन्यातील आंतरवालीत त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण कमी होऊ ने देण्यासाठी आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्यासाठी उपोषण केले होते. त्यानंतर, आता धनगर समाजाला एसटी प्रवर्गातू आरक्षण देण्याची मागणी करत दीपक बोऱ्हाडे मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत.

दरम्यान, दीपक बोऱ्हाडे यांचे उपोषण सुरू असतानाचा त्यांच्या सासऱ्यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामराव होळकर यांच्या पार्थिवावर आज गुरुवार, 26 मार्च 2026 रोजी 11 वाजता संगम तलाव स्मशानभूमी, त्रिशरण चौक बुलढाणा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. बोराडे उपोषण अवस्थेतच बुलढाण्यात ऍम्ब्युलन्स मध्ये येणार असून आधी रणजित अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या सासऱ्याच्या घरी जाणार आणि तेथून अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार असल्याचे कळते.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत