spot_img

खळबळजनक ! माळविहिरमधील रॉयल अपार्टमेंटचे अवैध बांधकाम भोवले

आजी-माजी सरपंचांसह तत्कालीन सचिवविरोधात गुन्हा दाखल

बुलढाणा, 27 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : ग्रामपंचायत माळविहीर येथील रॉयल अपार्टमेंट बांधकाम परवानगी प्रकरणात कथित नियमबाह्य कामकाज आणि बनावट कागदपत्रांच्या वापराचा आरोप करत बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी माजी सरपंच सौ. उषा सुनिल खैवान, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी माणिक प्रल्हाद शेळके तसेच विद्यमान सरपंच सौ. अर्चना दिलीप आडवे यांचेवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आजी-माजी सरपंचान वर गुन्हे दाखल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी बुलढाणा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मधुकर रामराव गवते यांनी बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार, माजी सरपंच सौ. उषा सुनिल खैवान, तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी माणिक प्रल्हाद शेळके तसेच विद्यमान सरपंच सौ. अर्चना दिलीप आडवे यांनी 27 एप्रिल 2015 ते 9 जानेवारी 2018 या कालावधीत रॉयल अपार्टमेंट बांधकामासाठी परवानगी देताना नियमबाह्य प्रशासकीय प्रक्रिया राबवली. तसेच, मूळ दस्तऐवजांमध्ये कथित बनावट कागदपत्रांचा समावेश करून संबंधित बांधकामास परवानगी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. नॅशनल बिल्डर्स डेवलपर्स चे शेख अहेमद शेख महेबुब, काशिद अहमद शेख यांना गट नंबर 233 मधील प्लॉट 20, 21, 22, 23 वर बांधकाम करण्यासाठी परवानगी देताना ग्रामपंचायत मधील मुळ दस्तऐवजामध्ये खोट्या व बनावट कागदपत्रांचा समावेश करीत चुकीचे दस्तऐवज बनविण्यात आले. अपार्टमेंट बांधकाम करण्याची परवानगी नसताना ही परवानगी देण्यात आली आहे.
तसेच, तत्कालीन ग्रामसेवक माणिक शेळके यांनी अधिकार नसताना 9 जानेवारी 2018 रोजी बांधकाम पूर्णत्वाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणात शासनाची दिशाभूल झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
या संदर्भात गट विकास अधिकारी पंचायत समिती बुलढाणा, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था तसेच विशेष लेखा परीक्षक यांच्या अहवालांचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी विविध कलमान्वये बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये आजी व माजी सरपंच यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. गंभीर बाब म्हणजे तीन महिन्यांपूर्वी गट नंबर 238 मध्ये अशाच प्रकारचे अवैध बांधकाम प्रकरणी तत्कालीन सरपंच खैवान आणि तत्कालीन ग्रामसेवक शेळके यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यावेळी शेळके यांना निलंबित करण्यात आलेले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत