बुलढाणा, 29 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : प्रेमाची अन् बंधुभावाची शिकवण देणारा सण म्हणजे रमजान ईद सद्यास्थितीत असलेल्या सामाजिक परिस्थितीमध्ये सर्वधर्मीय बांधवांनी आपली एकात्मता जपत सामाजिक समता, बंधुता अबाधित राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जगाची वाटचाल सध्या व्देष अहंकार आणि नकारात्मकतेच्या दिशेने सुरू असताना आपल्या देशाची मूळ शिकवण ही “विश्वची माझे घर” असल्यामुळे सकारात्मक विचारांची पेरणी झाली पाहिजे यासाठी मंगळवारी ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकार हे नेहमीच समाजाच्या हितासाठी रात्रंदिवस आपले काम करीत असतात. समाजा समाजात बंधूभाव नांदला पाहिजे यासाठी आपल्या लेखणीतून नेहमीच व्यक्त होतात. देशातील बदलत्या सामाजिक परिस्थितीला निव्वळ या देशातील काही मूठभर समाज विघातक प्रवृत्ती कारणीभूत असून या सर्व गोष्टींना विरोध करणे हे प्रत्येक भारतीय नगरिकाचे कर्तव्य नाही तर जबाबदारी आहे. मागील वर्षीसुध्दा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बुलढाणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. बुलढाणा ‘हे शहर है अमन का और मोहब्बत करने वालो का’ त्यामुळे सर्वांमध्ये प्रेमाची व सलोक्याची भावना निर्माण व्हावी या उदात्त हेतूने बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ईद मिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यत आले आहे. मंगळवार, 31 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता पत्रकार भवन, सैनिकी मंगलकार्यालयाजवळ बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.



