spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का… नरेश शेळके यांनी आता काँग्रेसचा हात धरला पक्का

बुलढाणा, 1 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : काँग्रेस पक्षाला जिल्ह्यातच नाही तर देशभरात गळती लागली आहे. पण बुलढाण्यात मात्र काँग्रेस मध्ये इनकमिंग होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी संदिप शेळके यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. आता दुसऱ्या शेळकेंनी सुद्धा काँग्रेसचा हात हातात घेतला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड.गणेश पाटील यांच्या उपस्थितीत काल ३१ मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी प्रवेश केला आहे. सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा प्रचंड दबाव होता. म्हणून कुणालाही कळू न देता या तिघांनी या चौघांनी चुपचाप जाऊन प्रवेश घेतला आहे. नरेश शेळके यांच्यासोबत संतोष रायपूरे, बी टी जाधव, संगितराव भोंगळ यांनी सुध्दा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
काल ३१ मार्च रोजी कोल्हापूर येथे राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला मल्लिकार्जुन खरगे आले होते. तेव्हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्याकडून बुलढाणा शहारात मोठा पक्षप्रवेश सोहळा घेण्यासाठी वेळ घेतली आहे. येणाऱ्या काही दिवसांत मोठा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी याला दुजोरा दिला आहे. नरेश शेळके राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. निष्ठेचे शिलेदार असलेले नरेश शेळके काँग्रेस मध्ये आल्यामुळे त्यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडण्याची दाट शक्यता आहे. या आधीच एक शेळके जिल्हाध्यक्ष पदावर लवकर विराजमान होणार असल्याच्या चर्चा रंगत असताना दुसरे शेळके त्यांना ओव्हरटेक करताना दिसत आहे. नरेश शेळके यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केला असल्याचे सांगितले. (ए .फू.)

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत