गारडगावचे ग्रामसेवक १० हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले…
गावठाण जमिनीचा फेर रद्द करण्यासाठी मागितली लाच; ACBची कारवाई
बुलढाणा, 2 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : खामगाव तालुक्यातील गारडगाव येथील ग्रामसेवक विजय गवई यांना शेतकऱ्याकडून १० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावठाण जमिनीचा चुकीचा फेर रद्द करून देण्यासाठी ग्रामसेवक विजय गवई यांनी संबंधित शेतकऱ्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर ACB पथकाने सापळा रचून कारवाई केली. दरम्यान, लाच स्वीकारताना विजय गवई यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत