spot_img

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी….. शितल जालिंदर बुधवत कर सहाय्यक पदी निवड

बुलढाणा, 7 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे आई-वडील जर सुसंस्कृत आणि ज्ञानी असतील, तर त्यांची मुले हुशार, सक्षम आणि अधिकारी बनतात याचा प्रत्यय आला आहे. तो म्हणजे शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि बुलढाणा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कमलताई बुधवत यांची कन्या शितल बुधवत यांची कर सहाय्यक पदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातून राज्यातून 9 वा क्रमांक प्राप्त केला आहे. शितल बुधवत यांनी बुलढाणा येथील भारत विद्यालयात बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले. पुढील उच्च शिक्षण पदवी व पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे पुर्ण केला. शितल यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी पुणे येथे केली. जालिंदर बुधवत राजकारणी कमी आणि समाजासाठी म्हणून त्यांची जिल्ह्याला ओळख आहे. मासरूळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये त्यांनी पद असो व नसो त्यांनी विकास कामे खेचून आणले. सामाजिक कार्यात नेहमीच ते अग्रेसर असतात. घरातील प्रमुख व्यक्तीचे आचरण व त्यांचा प्रभाव हा सहाजकीच कुटुंबावर असतो. त्यामुळे शितल यांच्यावर सुद्धा वडिलांच्या सेवेच्या वारशाचा प्रभाव असल्याने त्यांनी शासकीय सेवेतून समाजाची सेवा करण्याची खूणगाठ मनाशी बांधून त्यांनी ते सत्यात उतरवले आहे. आता वडीलांच्या सेवेचा वारस त्या जोपसणार आहे.‌ त्यांची कर सहाय्यक पदी निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्या आपल्या यशाचे श्रेय आई वडील व गुरूजनांना देतात.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत