बुलढाणा, 11एप्रिल ( गुड इव्हीनींग सिटी ): बुलढाणा आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दलाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे जनक माननीय श्री प्रवीण भाई तोगडिया दिनांक 12 एप्रिल वार रविवार रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून ते 8 एप्रिल रोजी महाराष्ट्रात दाखल झाले शिरपूर चाळीसगाव छत्रपती संभाजी नगर जालना जिल्ह्यातील सभा आटपून ते उद्या सकाळी 11 वाजता बुलढाणा शहरात दाखल होत संगम चौक येथे कार्यकर्त्यांच्या हस्ते त्यांच स्वागत होणार असून बुलढाणा येथील शिवनाथसिंग राजेंद्रसिंग राजपूत यांच्या परिवाराला ते भेट देतील व मोताळा येथे भव्य स्वागत समारंभ तसेच शेंबा येथे त्यांचे स्वागत असून ते कार्यकर्त्यांना संबोधित करतील व खामगाव कडे रवाना होतील तरी सर्व हिंदू बांधवांना प्रवीण भाई यांच्या आगमन समारंभामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले अशी माहिती जीवनसिंग राजपूत राष्ट्रीय बजरंग दल विदर्भ प्रांत मंत्री यांनी दिली आहे



