spot_img

धुरंधर वाघ ज्ञानगंगा अभयारण्य सोडून गेला…?

ज्ञानगंगा अभयारण्यात मोठ्या प्रतिक्षेनंतर “धुरंधर” वाघाची एंट्री झाली पण या वाघाचे गेल्या महिनाभरापासून त्याचे लोकेशन ट्रॅक होत नव्हते. त्यामुळे हा धुरंधर वाघ कुठे गेला याचा शोधाशोध वन विभागाकडून सुरू करण्यात आला. कारण या आधी “टी वन” हा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात आणण्यात आला होता. तो जेमतेम नऊ-दहा महिने ज्ञानगंगा अभयारण्यात राहिला परंतु अचानकच तो निघून गेला. त्यामुळे आताच तीन महिन्यांपूर्वी आणलेला धुरंधर वाघ सुद्धा निघून गेला कि काय अशी भिती व्यक्त होत होती. परंतु आनंदाची बाब म्हणजे कालच ११ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता धुरंधर वाघ ज्ञानगंगा अभयारण्यातील देव्हारी क्षेत्रात असलेल्या वाकी बिट जवळ आढळून आला आहे. त्यामुळे वन विभागाच्या जीवात जीव आला असेच म्हणावे लागेल. दुसरी आनंदाची बातमी म्हणजे एकट्या राहणाऱ्या धुरंधर वाघला जोडीदाराची प्रतिक्षा आहे. कारण जोडीदार नसल्याने या आधी टी वन‌ वाघाने ज्ञानगंगा अभयारण्यातून पलायन केले होते. हाच धागा पकडत वन विभागाने धुरंधर वाघासाठी जोडीदाराचा शोध घेणे सुरू केले होते. त्यामुळे आता धुरंधर वाघाची जोडीदाराची ती ही प्रतिक्षा आता संपणार आहे कारण येत्या १५ दिवसांत ज्ञानगंगा अभयारण्यात वाघिण दाखल होणार असल्याची खात्रीलायक माहिती गुड इव्हिनिंग सिटीला प्राप्त झाली‌ आहे. गुड इव्हिनिंग सिटी आपल्या वाचकांसाठी काल ११ एप्रिल रोजीचा दिनांक आणि वेळेसह असलेला धुरंधर वाघाचा फोटो आणि व्हिडिओ बातमी मध्ये शेअर करीत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत