spot_img

बुलढाणा लोकसभेसाठी 26 एप्रिल रोजी मतदान, 4 जूनला निकाल

बुलढाणा जिल्हा

बुलढाणा, १६ मार्च (गुड इव्हिनिंग सिटी/अजय काकड) आज निवडणूकीच्या तारखांचा बिगुल वाजला. देशात सात टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूका होणार आहेत. बुलढाणा लोकसभा मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या २०१९ च्या निवडणूकीत शिवसेनचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी ५,२१,९७७ मते मिळवून विजय संपादन केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ राजेंद्र शिंगणे यांना ३,८८,६९० मते मिळाली होती. प्रतापराव जाधव यांना त्यांच्यापेक्षा १ लाख ३३ हजार २८७ अधिक मते मिळाली होती २०२४ च्या निवडणूक अयोगच्या माहितीनुसार जिल्ह्यात आजघडीला २० लाख ५३ हजार १२५ मतदार आहेत. मलकापूर, बुलडाणा, चिखली, सिंदखेड राजा, मेहकर, खामगाव, जळगाव जामोद या विधानसभेतील हे मतदार रहिवासी आहेत. प्रारूप मतदार यादी मध्ये १८ ते १९ वयोगटातील मतदार यादीत ६ हजार ९१८ नवमतदार होते. तर अंतिम मतदारयादीमध्ये याच वयोगटातील मतदारांची आकडेवारी २५ हजार ९७७ झाली, तर सद्यस्थितीमध्ये २८ हजार ६०३ नवमतदार आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात यावेळेस लढण्यासाठी खा. प्रतापराव जाधव, प्रा. नरेंद्र खेडेकर, रविकांत तुपकर, संदिप शेळके यांनी लोकसभेचे तयारी केली आहे. खा. प्रतापराव जाधव यावेळेस विजयाचा चौकर मारणार की उमेदवार बदल्याने त्यांचे स्वप्नच राहणार हे बघावे लागेल. त्यांना महायुतीची उमेदवारी मिळेल अशी अशा त्यांना आहे. पण भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांचाकडूनही महायुतीची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहे. तर महाविकास आघाडी कडून नरेंद्र खेडेकर यांनी सुध्दा कंबर कसली आहे. पण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे चिखली व मोताळा दौऱ्यावर असतांना त्यांनी त्यांच्या उमेदवारी विषयी कुठलच भाष्य न केल्याने अजूनही त्यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम आहे. तर परिवर्तन निर्धार यात्रा घेऊन निघालेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या सभांना गर्दी सुध्दा बघायला मिळत आहे. ते अपक्ष लढणार असल्याचे त्यांनी सांगितल होते. बुलढाण्याच्या परिवर्तनाचा ध्यास घेऊन निघालेले संदीप शेळके यांनी ही वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून परिवर्तन रथयात्रा काढली आहे. ते ही लोकसभा लढणार आहे. अजून कोण उभे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत