spot_img

बुलढाण्यात चिनी मांजाने कटला मुख्याध्यापकाचा गळा !

■ वेळीच उपचार मिळाल्याने वाचले किंबहुने सर.. काळ आला होता पण वेळ नाही !

बुलढाणा, १६ मार्च (गुड इव्हिनिंग सिटी / रणजीतसिंग राजपूत): वाईट गोष्टींचे उगमस्थान चीन का आहे ? कळायला मार्ग नाही. कोरोनासारखा महाभयंकर व्हायरस जगाला देणाऱ्या चीनमधून घातकच वस्तू भारतात येतात. फटाके, खेळणे, बॅटरी अशा एक ना अनेक बोगस चायनामेड वस्तू भारतात सर्रास विकल्या जातात. या वस्तूंपैकी एक म्हणजे चीनी मांजा, एका सुदर्शन चक्राप्रमाणे अनेकांसाठी धोकादायक ठरत असल्याचे चित्र आहे. चिनी मांज्यामुळे काल, एका मुख्याध्यापकाचा गळा चिरून ते गंभीररित्या दूसऱ्याच क्षणाला जवळपास तीन ते चार गल्लीपार करून हा धागा तिथपर्यंत होता. संशय असा आहे की, बाजूलाच असलेल्या शासकीय डि.एड. मैदानावर अनेक मुले पतंग उडवित असतात, त्यांच्यापैकी कुणाचातरी पतंग कटून हा जीवघेणा धागा रस्त्यात एखाद्या काळाप्रमाणे आडवा झाला. त्याच्या गळ्यातून रक्ताच्या धारा उसळल्या.. गळ्यात अडकलेला चीनी मांजा होता, हे एव्हाना त्यांच्या लक्षात आले होते. त्याच ठिकाणाहून जाणाऱ्या एका धाडसी तरुणीने सरांना तत्काळ गाडीवरून बसवून हॉस्पीटलला आणले, त्याठिकाणी चीन मांज्यावर केंद्र सरकार आणि राष्ट्रीय हरीत लवादाने बंदी आणलेली आहे. तरीही हा धागा बुलढाणा शहरात काही विशीष्ट दूकानांवर मिळत आहे. या दूकानदारांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेला पाहीजे. चीनी मांजा म्हणजे नायलॉनच्या या धाग्याला विशीष्ट प्रकारचा घोळ तयार करून त्यात काचेचे बारीक तुकडे टाकले जातात. धातू व लोखंडाचा भुगाही टाकला.

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत