spot_img

छानणीमध्ये 4 उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणाबाहेर 

बुलढाणा, 5 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची आज छानणी करण्यात आली. या छाननी मध्ये चार उमेदवार “हिट विकेट” झाले आहेत. अर्थात या चारही जणांना अर्जामधील त्रुटी भोवली. विशेष म्हणजे यामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा समावेश आहे. त्यांनी शिवसेना पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला होता परंतु त्यांच्याकडे एबी फॉर्म नसल्यामुळे छानणी मध्ये त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यांनी एकच अर्ज भरला होता. उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची घोषणा आ. संजय गायकवाड यांनी केली होती. परंतु त्याची आता काही गरज उरलेली नसल्याचे आता स्पष्ट आहे. विजयराज शिंदे यांचाही अर्ज बाद झाला आहे. तसे पाहता पाच अर्ज बाद झाले आहेत परंतु विजयराज शिंदे यांनी भाजप पक्ष आणि दुसरा अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरलेले होते. त्यापैकी भाजप पक्षाकडून भरलेला अर्ज बाद करण्यात आलेला आहे. अर्ज बाद होणाऱ्यांमध्ये श्याम बन्सीलाल शर्मा अपक्ष, विलास शंकर तायडे बहुजन समाज पार्टी, ऍड. सैय्यद मुबीन यांचा समावेश आहे. आमदार संजय गायकवाड यांच्यासह एकूण चार जणांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. श्याम शर्मा यांच्यामध्ये त्रुटी होती तर एडवोकेट सय्यद मुबीन यांच्या उमेदवारी अर्ज मध्ये सूचकची स्वाक्षरी नाही तसेच विलास तायडे यांनी दहा जणांच्या स्वाक्षरीसह उमेदवारी अर्ज भरलेला नसल्यामुळे त्यांना छाननीत निवडणूक रिंगणातून बाहेर काढण्यात आले आहे.  अर्ज मागे घेण्याची मुदत 8 एप्रिल पर्यंत आहे. परंतु उद्या शनिवार आणि परवा रविवार असे दोन दिवस शासकीय सुट्टी असल्यामुळे सोमवार 8 एप्रिल रोजी दुपारी 3:00 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. 

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत