महाविकास आघाडीची महारॅली…प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

बुलढाणा, ४ एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी/अजय काकडे) 'जे बाळासाहेबांचे होवू शकले नाहीत, ते जनतेचे काय होणार ! म्हणून गद्दारांना धडा शिकवा आणि खुद्दारांना निवडून आणा', असे घणाघाती आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने यवतमाळ - वाशिम लोकसभा मतदार संघात राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी पक्षाने विद्यमान खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट केला आहे. शिंदे गटातील या घटनाक्रमावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधत शिंदेंसोबत गेलेल्या नेत्यांना विचार करण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही त्यांना (भावना गवळी) तब्बल ५ वेळा खासदार केले. पण आता १० तास थांबूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे गद्दारांनी याचा विचार करावा, असे ते म्हणालेत. आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मविआ चे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) अधिकृत उमेदवार नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतांना आदित्य ठाकरे उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी बुलढाणा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला सुषमा अंधारे यांनी संबोधीत करत असातांना सरकार वर टिका केली. आ. गायकवाड यांच्या आग्यामोहळच्या वक्तव्याचा विशेष समाचार घेतला, अंधारे यांनी भाजप वर एक खरमरीत कवीता सादर करत टिका केली. आदित्य ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधत असतांना एकनाथ शिंदे गटावर टिका करत शिवसेनेने ज्यांना खासदार बनवलं त्यांना आता शिंदे गट उमेदवारीही देत नाहीये, त्यामुळे मद्दारांनी विचार करावा, असं वक्तव्य उद्धब ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी केला. भावना गवळी यांना यवतमाळ वाशिम येथून उमेदवारी दिली गेली नाही. त्यावरुन आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना सुनावलं आहे. ज्यांना शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा खासदार बनवलं, त्यामध्ये एक व्यक्ती अशी आहे की त्यांना पाच वेळा खासदार बनवलं (भावना गवळी), त्यांना दहा तास थांबून सुद्धा तिकीट मिळालं नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी भावना गवळी यांचं नाव न घेता केली. एका निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली असून शिवसैनिक, मविआचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण क्षमतेने काम करून, तळागाळापर्यंत पोहचून नरेंद्र खेडेकर यांना निवडून आणतील असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांचा प्रतिसाद लाभला. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुषमा अंधारे, आ. सुनिल भुसारा, बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, आ. राजेश एकडे माजी आमदार नानाभाऊ कोकरे, माजी आमदार राहुल बोंद्रे, जालिंधर बुधवत, जयश्रीताई शेळके, आशिष रहाटे, विजय अंभोरे, प्रसेनजीत पाटील, नरेश शेळके, संजय राठोड, ज्योतीताई खेडेकर, स्वातीताई वाकेकर, रविकांत बरपे यांच्यासह मविआ चे स्थानिक पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते, महिला भगिनी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महारॅली काढून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते नरेश शेळके, शिवसेना जिल्हाप्रमुख जालीधर बुधवत यांची उपस्थिती होती.