spot_img

बुलढाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांचे बनावट ओळखपत्र तयार केले !

मास्टरमाईंड दोन फोटोग्राफर विरोधात गुन्हा 

बुलढाणा, 13 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) ः पोलिसांची बनावट ओळखपत्र तयार करणार्‍या शहरातील दोन फोटोग्राफर विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधिक्षक कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपीक सुषमा संजय जाधव यांनी बुलढाणा शहर पोलिस स्टेशन मध्ये जमील शाह यासीम शाह (साई फोटो स्टुडीओ) कारंजा चौक, बुलढाणा आणि प्रशांत गायकवाड (भावना फोटो स्टुडीओ) कारंजा चौक, बुलढाणा यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुषमा जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्याकडे पोलीस विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे ओळखपत्रासंबंधीचे काम आहे. बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या लेखी विनंती अर्जावरुन त्यांचे पोलीस विभागाचे ओळखपत्र अधिकृत प्रेस मधुन तयार करुन कार्यालयाचे सही शिक्यानिशी सबंधीत पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रितसर पुरविण्यात येतात. दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी त्या पोलीस अधिक्षक कार्यालयात डयुटीवर हजर असतांना त्यांना समजले की, बुलढाणा जिल्हा पोलीस घटकातील काही पोलीस कर्मचारी यांना बुलढाणा कारंजा चौकातील साई फोटो स्टुडीओ व भावना फोटो स्टुडीओ मधुन पोलीस अधीक्षक यांच्या बनावट सहीचे बनावट पोलीस ओळखपत्र बनवुन दिले असुन आणखी काही बनावट पोलीस ओळखपत्र तयार करुन दिले जात आहेत. म्हणुन त्यांनी दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी दुपारी 1 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कर्मचारी दत्ता जिते यांना बनावट पोलीस ओळख पत्राबाबत माहीती दिली व खात्री करण्यासाठी साई फोटो स्टुडीओ व भावना फोटो स्टुडीओ येथे जावुन त्यांचे स्वतःचे ओळखपत्र बनवुन आणण्यास पाठविले असता दत्ता जितेे यांनी साई फोटो स्टुडीओ, कारंजा चौक, बुलढाणा येथे जावुन त्यांचे पोलीस ओखळपत्र घेवुन दुपारी 2 वाजता कार्यालयात आले व त्यांनी सांगीतले की, साई फोटो स्टुडीओचे मालक जमील शाह यासीन शाह यांनी 150  रुपयात त्यांचे स्टुडीओ मध्ये कॉम्पुटरवर ओळखपत्र बनवुन दिले आहे. हेे ओळखपत्र मी पाहीले असता ते पुर्णपणे बनावट असुन त्यावर असलेली स्वाक्षरी सुध्दा बनावट असल्याचे माझ्या निदर्शनास आले. दिनांक 12 एप्रिल रोजी दुपारी 1  ते 2 वाजताचे दरम्यान जमील शाह यासीम शाह, साई फोटो स्टुडीओ, कारंजा चौक, बुलढाणा यांनी पोलीस विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनाधिकृतपणे स्वतःच्या आर्थीक फायद्यासाठी त्यांचे फोटो स्टुडीओ मध्ये कॉम्प्युटरवर पोलीस कर्मचारी ’दता जिते यांना त्यांचे पोलीस अधीक्षक यांच्या बनावट सहीचे बनावट पोलीस ओळखपत्र तयार करुन दिले असुन यापुर्वी सुध्दा त्यांनी व प्रशांत गायकवाड, भावना फोटो स्टुडीओ, कारंजा चौक, बुलढाणा यांनी पैसे घेवुन बरेच पोलीस कर्मचारी यांना बनावट पोलीस ओळखपत्र तयार करुन देवुन पोलीस विभागाची फसवणुक केली आहे. तरी जमील शाह यासीन शाह व प्रशांत गायकवाड यांच्यावर  कलम 420,465,466,34 भादवी अंतर्गत बुलढाणा शहर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि.सखाराम सोनुने हे करत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत