◼️ 12 ते 15 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
◼️नरेंद्र खेडेकरांसाठी धोक्याची घंटा
बुलढाणा, 17 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : दोन दिवसांपूर्वी सहसंपर्क प्रमुख भास्कर मोरे आणि शरद हाडे यांच्या पक्षत्यागानंतर शिवसेना उबाठा गटाला खिंडार पडले आहे. परंतु आज मात्र मोठे भगदाड पडल्याची खात्रीलायक माहिती गुड इव्हिनिंग सिटीला मिळाली आहे. उबाठा वाहतूक सेनेचे पदाधिकारी तसेच काही फादर बॉडीचे पदाधिकारी राजीनामा देऊन नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारापासून नामानिराळे झाले असल्याचे समजते. याबाबत कालच उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठविला असल्याचीही माहिती आहे. राजीनामा देण्यामागे उबाठाचे जिल्हाप्रमुख कारणीभूत असल्याची तक्रार आहे. पक्षाने दिलेले लोकसभा उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारात जिल्हाप्रमुख जाणूनबुजून ढिलाई करीत असून त्यांचा उद्देश्य उमेदवाराला पाडण्याचा असून संशयास्पद असल्याचाही आरोप राजीनामा देणाऱ्यांचा आहे. राजीनामा देणारे आता कुणाचं काम करतील? की, राजीनामे परत घेतील? हा सवाल आहे. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारासमोर या राजीनामा बॉम्ब मुळे नक्कीच अडचणी वाढणार, यात शंका नाही.