spot_img

‘ सही टायमिंग ‘ सह गायत्री शिंगणेंची राजकारणात एंट्री

बुलढाणा, २ मे (गुड इव्हिनिंग सिटी/अजय काकडे) : प्रत्येक क्षेत्रात टायमिंगला महत्य आहे… कला क्षेत्रात टायमिंग साधणारा कलाकर लोकप्रिय ठरतो. राजकारण सुध्दा कला आहे आणि राजकारणामध्ये ज्यांना सही टायमिंग समजेल ते यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही… हातावरचं घड्याळ बाजूला ठेवत हाती तुतारी घेणाऱ्या गायत्री शिंगणेनी प्रत्यक्ष राजकारणामध्ये एंट्री घेतली आहे. आता सही टायमिंग कोणतं म्हणाल? तर आजपर्यंत एकामेकांच्या विरोधात लढलेल्या नेत्यांनी महायुतीच्या पंगतीत.. महायुतीचे डफडे वाजवायला सुरूवात केली अणि महाविकास आघाडीकडे कुणी सक्षम पर्याय दिसत नसल्याचे लक्षात आल्यामुळे गायत्री शिंगणे यांनी तुतारी फुंकायला सुरूवात केल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे काल १ मे रोजी त्यांच्या मुळगावी शेंदुर्जन येथे हभप इंदोरीकर महराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्या राजकारणातील प्रत्यक्ष प्रारंभाचा शंखनाद करून गेला. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजेंद्र हिँरणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार प्क्षाच्या बुलढाणा जिल्हा महिला कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. डॉ. शिंगणे हे अजित पवार गटात असतांना गायत्री शिंगणे या शरद पवार गटात गेल्याने अनेकांच्या भुय्या उंचवल्या आहे. त्या राष्ट्रवादी काँग्रेस नध्ये सक्रीय होत्या भविष्यात त्या सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाच्य महाविकास आघाडीकडून उमेदवार राहू शकतात. पाच महिन्यांवर राज्यातील विधानसभेच्या निवडणूका आहे. याची तयारी म्हणून की काय त्यांनी त्यांच्या मुळगावी १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त हभप इंदोरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सिंदखेड राजा मतदार संघातील आज जर विधानसभेचं गणित बघतिलं तर सध्या डॉ. राजेंद्र शिंगणे हे मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहे. या आधीच्या निवडणूकांमधील आता पर्यंत जे प्रतिस्पर्धी होते ते महायुतीत आहे. माजी आमदार तोताराम कार्यदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे हे सध्या महायुतीचा भाग आहे. यामध्ये माजी आमदार डॉ. शशीकांत खेडकर हे २०१९ च्या विधानसभा निवडणूकीमध्ये त्यांचा ८ हजाराच्या फरकाने पराभव झाला होता. महाविकास आघाडीत डॉ. शिंगणे असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंद केले. परंतू नंतर काही महिन्यांनी अजीत पवार हे महायुतीत सामील झाल्याने डॉ. शिंगणे सुध्दा त्यांच्या सोबत आल्याने त्यांची मतदार संघावरील दा- वेदारी मागे पडली. पण ते विधानसभा निवडणूक लढू शकतात. तोताराम कार्यदे यांचे पुत्र डॉ. सुनिल तोताराम कायंदे हे महाराष्ट्र ओबीसी मोर्चा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आहे. येणाऱ्या कलावधीत ते सुध्दा महायुतीकडून उमेदवारी मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंजारी समाजचं प्राबल्य असणारा हा मतदारसंघ आहे. डॉ. सुनिल कायंदे हे पंकजा मुंडे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती रामजले जातात. त्यांचे वडील तोताराम कायंदे यांनी सुध्दा या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलेलं आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे हे सुध्दा या मतदारसंघावर आपला हक्क सांगू शकतात. त्यांनी २०१४ मध्ये भाजपकडून निवडणूक लढविली आहे. तसेच भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सविता मुंडे या वंचीत बहुजन आघाडीमध्ये आहे. त्यामुळे नहाविकास आघाडीकडे सध्या तरी सिंदखेड राजा मतदार संघात प्रबळ दावेदार नाही. जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरागत जागा आहे. महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद प्यार गटाला सुटू शकते. तर महायुतीत ही जागा विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या कडेच राहिल कारण ते या मतदारसंघाचे १९९५ ते २०२४ पर्यंत आमदार आहेत. त्यातील २०१४ चा डॉ. शशिकांत खेडेकरांचा अपवाद वगळला तर ते सलग आमदार आहेत. त्यामुळे डॉ. शिंगणे यांनाच येथे उमेदवारी मिळू शकते. हीच संधी हेरत गायत्री शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला आहे. त्या येणाऱ्या विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत