spot_img

बुलढाण्यातील स्वामी समर्थ केंद्रातील मूर्ती चोरली 

दोन तासात चोरटे ताब्यात

◾ रात्री 12 वाजता मूर्ती चोरली सकाळी 8 वाजता चोरटे अटक 

◾ एलसीबी आणि बुलढाणा शहर पोलिसांची संयुक्त कारवाई 

बुलढाणा, 03 जून ( गुड इव्हिनिंग सिटी) : येथील सरस्वती नगर मधील श्री स्वामी समर्थ केंद्रातील समर्थ स्वामी आणि इतर काही देवतांच्या मुर्त्या काल मध्यरात्री नंतर चोरीला गेल्या होत्या. हा प्रकार सकाळी उघडकीस आल्यानंतर बुलढाणा शहर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे कारवाई करत चोरांना काही तासातच अटक केली. चोरी केलेल्या साहित्यामध्ये स्वामी समर्थांची तळहाता एवढी पंचधातूची मूर्ती, तांब्याचे दोन हत्ती, चांदीचा मुकुट तसेच शिवपिंड आणि इतर छोटे साहित्याचा समावेश आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आणि भक्तांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये याची खबरदारी घेत एलसीबी प्रमुख पीआय अशोक लांडे आणि बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे या दोघांनीही चोर शोधण्याकरता आपली पथके तैनात केली. त्यात हेडकॉन्स्टेबल दीपक लेकुरवाळे, पोलीस नाईक समीर भुजबळ तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी युवराज शिंदे आणि विनोद भुरे तथा इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा या पथकामध्ये समावेश होता. सकाळी 10 च्या आत मूर्ती चोरणाऱ्यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. चोरांमध्ये त्याच भागातील एका बाल गुन्हेगाराचा समावेश आहे. तर दुसरा त्याचा साथीदार ही बालगुन्हेगार आहे. ज्याने मूर्ती चोरल्या त्याचे वय 16 वर्ष असल्याचे समजते. मुख्य आरोपी बाल गुन्हेगाराने यापूर्वीही अशा भुरट्या चोऱ्या केलेले आहेत. 

फोटो सौजन्य : रविकिरण टाकळकर

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत