spot_img

‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’ फेम ऋषिकेश रिकामे एडेडच्या प्रांगणात करणार स्वरांची उधळण !

बुलढाणा, १३ मे (गुड इव्हिनिंग सिटी) : रामनवमी, १ एप्रिल, सन २०१२ च्या शुभ मुहूर्तावर सायं दैनिक ‘गुड इव्हिनिंग सिटी’ने वृत्त प्रवासाला सुरुवात केली. तत्पूर्वी समस्त बुलढाणेकरांसाठी विकसित जिल्ह्याचे ध्येय बाळगून तसेच सकारात्मकतेची ज्योत पेटवून’ बी – पॉझिटिव्ह’ नावाचा अंक प्रकाशित करण्यात आला होता. तेव्हाप- ासून खऱ्या अर्थाने सुरू झालेल्या सकारात्मक वृत्त प्रवास अविरतपणे सुरू आहे. काळाच्या प्रचंड वेगांनतर आज गुड इव्हिनिंग सिटीला एक तप उलटले आहे. अर्थात १२ वर्ष पूर्ण झालेत, दरम्यानचा हा काळ जेवढा संघर्षाचा होता, तितकेच परिवर्तन घडवून आणण्यासाठी सक्षम सुद्धा ठरला. विशेष म्हणजे कोरोना काळात अचूक आणि सविस्तर अपडेट देवून जिल्ह्याच्या पत्रकारितेत ब्रेकिंगचे नवे विश्व उभारले. आणि बातम्यांच्या माध्यमातून महामारीच्या काळात भयभीत झालेल्या बुलढाणेकरांना धिरही देण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. या बारा वर्षाच्या दीर्घकाळात गुड इव्हिनिंग सिटीच्या वाचन प्रिय नागरिकांनी, जाहिरातदारांनी, हितचिंतकांनी मोठे भांडवल नसताना देखील टिकवून ठेवले, हे विशेष. गुड इव्हिनिंग सिटी आणि समस्त बुलढाणेकर तथा वाचक वर्ग यांच्या नात्यातील ऋणानुबंध दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. असंख्य शुभचिंतकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा तपपूर्ती सोहळा ठरावा या हेतूने गझल भक्ती गीत भावगीतांची मैफिल आयोजित करण्यात आली आहे. येत्या शनिवारी, १८ मे रोजी सायंकाळी ठीक ६:३० वाजता एडेड हायस्कूलचे प्रांगणात महाराष्ट्राचा लाडका गायक तथा ‘मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा फेम’ ऋषिकेश रिकामे स्वरांची उधळण करणार आहेत. या सोहळ्याला आवर्जून उप- स्थित रहावे असे आवाहन मुख्यसंपादक रणजीतसिंग राजपूत तथा गुड इव्हिनिंग सिटी परिवाराने केले आहे. नेहमी बातम्यांची संध्याकाळ घेऊन येणारी गुड इव्हिनिंग सिटी शनिवारी, स्वरांची संध्याकाळ साकारणार आहे. महाराष्ट्राचा लाडका गायक ऋषिकेश रिकामे सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याचे शिवारातील गाणे राज्यभर सुपरहिट ठरले, ग्रामीण भागातून येणारा हा कलाकार संगीत प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यांच्यासह तबलावादक ओंकार भुसारे, हार्मोनियम वादक जयदेव भुसारे, व विणेकरी सोनाली मोजाड ह्या साधसंगत करतील. समस्त जिल्हा वासियांच्या घरातील सायंकाळचा पाहुणा म्हणून गुड इव्हिनिंग सिटीची ओळख झाली आहे. बुलडाणा शहरात तसेच जिल्ह्यात काहीही घडो सर्वात आधी वाचकांपर्यंत ती बातमी पोहोचविण्याचे काम गुड इव्हिनिंग सिटीने केले आहे. अर्थात माहिती पोहचविणाऱ्या सूत्रांनी गुड इव्हिनिंग सिटीला ब्रेकिंगाचा बादशाह बनवलं. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात लपून बसलेला भ्रष्टाचार उघड करत सत्याचा लख्ख प्रकाशात अन्याय अंधकाराचा विनाश करत तसेच समाजहित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न गुड इव्हिनिंग सिटी करत आहे. त्यामध्ये निर्भीडतेचा वसा घेवून वाटचाल करत असल्याने हा प्रवास जनतेचा बाणा बनण्यापर्यंत पोहचला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत