spot_img

जिजामाता महाविद्यालयाच्या प्रांगणात बाहरेच्यांना क्रिकेट-फुटबॉल खेळण्यावर प्रतिबंध !

फक्त फिरणार्‍यांना मुभा राहील

बुलढाणा, 25 मे (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुलढाण्यातील जिजामाता महाविद्यालयाचे प्रांगण सार्वजनिक असल्याचा अनेकांचा समज आहे. हा गैरसमज असल्याचे आज महाविद्यालय व्यवस्थापनाने प्रतिबंधात्मक नियमावली घोषित करून जाहीर केले आहे. महाविद्यालयाच्या परवानगीशिवाय याठिकाणी कुठल्याही प्रकारचे खेळ, स्पर्धा किंवा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करू नये तसेच महाविद्यालयाच्या प्रांगण परिसरात अमंली पदार्थांचे सेवन करू नये, अन्यथा पोलिस प्रशासनाच्या सहाय्याने संबंधितांविरोधात दंडात्मक तसेच कायदेशीर कार्रवाई करण्यात येईल, असा इशारा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे यांनी दिला आहे. केवळ जेष्ठ आणि सुज्ञ नागरिकांची गैरसोय होवू म्हणून सकाळी 6.30 ते 10 आणि संध्याकाळी 4.30 ते 7 वाजेपर्यंतच फिरण्यासाठी मैदान खुले ठेवण्यात येईल, असेही महाविद्यालयाने कळविले आहे. यासंदर्भात आज एक सूचनावली जाहीर करीत डॉ. कोठे म्हणतात की, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित जिजामाता महाविद्यालय, बुलढाणा यांच्या वतीने सर्व बुलढाणेकर नागरिकांना महाविद्यालयाच्या मैदानाचा वापर करण्याबाबत महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे खेळाचे मैदान व खुली जागा ही जिजामाता महाविद्यालयाची असून मैदानाचा उपयोग प्राधान्याने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी केला जातो. या वेतिरिकत कोणीही क्रिकेट, फूट बॉल, गोळा फेक किंवा इतर खेळ खेळू नये. खेळायस प्रतिबंधक कार्यवाही केली जाईल. शहरातील असंख्य सुज्ञ जेष्ठ नागरिक फिरण्यासाठी व योग-प्राणायाम यासाठी मैदानावर येतात. त्यांच्या सुविधेसाठी सकाळी 6.30 ते 10.00 पर्यंत व सायंकाळी 4.30 ते 7.00 पर्यंतच मैदान खुले राहील. या वेळे व्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना मैदान व महाविद्यालय परिसरात प्रवेश मिळणार नाही. मात्र मैदानावर कोणालाही आपले वाहन अथवा पाळीव प्राणी आणता येणार नाही. महाविद्यालय प्रशासनाची लेखी पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय बाहेरील कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांनी कुठलेही प्रशिक्षण कार्यक्रम व स्पर्धा यांचे आयोजन मैदानावर करू नये. महाविद्यालय परिसरात कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ बाळगणे, सेवन करणे किंवा असभ्य वर्तन करणे निषिद्ध आहे. अशा व्यक्तींवर प्रशासनाद्वारे किंवा प्रसंगी पोलिस प्रशासनाच्या साहाय्याने दंडात्मक कारवाई करण्यात येईल. मैदान परिसरातील संपत्ती, वस्तू, झाडे इत्यादींची तोडफोड अथवा नासधूस करणार्‍या व्यक्तीवर सुद्धा दंडात्मक कारवाई करण्यात येईल. या सर्व नियमांचे या वेळेचे बंधन पाळून मैदानाचा सदुपयोग करणार्‍या सुसंस्कृत नागरिकांचे महाविद्यालय स्वागतच करते. मात्र येथे येणार्‍या सदृहस्तांना विनाकारण त्रासदायक ठरू शकणार्‍या विकृत आणि विध्वंसक घटकांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असे आवाहन जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे यांनी केले आहे.

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत