◼️ चाइल्ड हेल्पलाइन सह कामगार अधिकारी कार्यालयाची धाड
बुलढाणा, 14 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : राजुर घाटाच्या पायथ्याशी असलेल्या विशाल वाईन बारवर काम करणाऱ्या तीन बालकामगारांची आज सुटका करण्यात आली. चाइल्ड हेल्पलाइनला आलेला तक्रारीनंतर जिल्हा बालकल्याण समिती आणि सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाने संयुक्तपणे धाड टाकली. अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचे असलेले तीन बालकामगार या ठिकाणी आढळून आले. विशाल धाब्याच्या मालकाविरोधात बालकामगार कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.विशाल धाब्याच्या मालकाचे नाव दिनेश इंगोले असून त्यांच्या विरोधात बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. ज्या बालकामकारांची सुटका केली त्यांना आता जिल्हा बालकल्याण समिती समोर उपस्थित केले जाणार आहे.