21 हजारांचा दंडही ठोठावला
जिल्हा सरकारी वकील ऍड. भटकर यांचा प्रबळ युक्तिवाद
बुलढाणा, 24 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : चिखली पोलिस स्टेशनला बलात्कार, ॲट्रॉसिटी, मारहाण प्रकरणी दिलीप जयस्वाल (वय ५८) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू शारीरिक संबंध परस्पर संमतीने ठेवल्याने त्याला बलात्कार व ॲट्रॉसिटी या कलमातू निर्दोष मुक्तता केली आहे. परंतू पिडीतेला घरात डांबून मारहाण केल्याप्रकरणी प्रकरणी केल्याप्रकरणी 2 वर्ष 6 महिने सक्तमजूरीची शिक्षा व 21 हजार रू.दंड असा महत्वपुर्ण निकाल न्यायाधीश श्री.आर.एन. मेहरे विशेष न्यायालय बुलढाणा यांनी आज दिनांक 24 मे रोजी निकाल दिलेला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार 21 हजारापैकी पिडीतेला नुकसानभरपाई म्हणून यामधील 15 हजार रुपये देण्यात येणार आहे. हकीकत अशा प्रकारे आहे की, सदरची घटना ही पुंडलिक नगर चिखली येथील असून यातील आरोपी दिलीप हरिकिसन जयस्वाल हयांचेविरूध्द पो.स्टे. चिखली येथे 35 वर्षीय पिडीतेने 25 सप्टेंबर 2019 रोजी दाखल केलेल्या तकारीवरून त्याच्या विरूध्द भा. दं.वि.चे कलम 376(2)(n), 342, 324, 506 व ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कलम 3(2)(va), 3(1)(w) (i). 3 (1) (w) (ii) दाखल करण्यात आला होता. पिडीतेची तक्रार अशा प्रकारे होती की, तिचे 2002 मध्ये एका सोबत लग्न झाले होते. तिच्या पतीने दहा वर्ष संसार झाल्यानंतर तिला सोडून मुंबईला निघून गेला. पतिपासून तिला 2 मुळे आणि 3 मुली आहेत. आरोपी दिलीप जयस्वाल आणि तिची रेणुका माता मंदिरात दर्शन घेतांना भेट झाली होती. आरोपीने पिडीतेला त्याच्या राहते घरी पुंडलिक नगर येथे बोलावून वेळोवेळी मुला-मुलींचा सांभाळ करेल व तुझ्या मुलीचे लग्न मी लावून देईल असे आमिष दाखवून तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध केला व अशाच प्रकारे 24 सप्टेंबर 2019 रोजी संध्याकाळी तिला घरी बोलावून डांबून ठेवले. घरामध्ये कोंडून ठेवून व तिचे सोबत वाद करून तिला फावडयाच्या दांडयाने पाठीवर डोक्यावर व दोन्ही हातावर मारहाण केली होती अशा प्रकारची तकार पिडीतेने पो.स्टे. चिखली येथे दाखल केलयावरून आरोपीविरूध्द वरील प्रमाणे गुन्हयाची नोंद करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हयाचा तपास तत्कालीन पो.नि. सचिन चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यानी केला होता व सबळ पुरावा मिळाल्यानतर वरील प्रमाणे आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
दोषारोपपत्र दाखल झाल्यानतर सदर रात्र खटला पुराव्याकामी लागल्यानंतर आरोपी विरुध्द दोषसिध्द होण्याच्या दुष्टीकोणातुन जिल्हा सरकारी वकील वसंत लक्ष्मणराव भटकर यांनी 7 साक्षीदार तपासले त्यापैकी पिडीता / फिर्यादी, घटनास्थळ व जप्ती पंच, वैद्यकीय अधिकारी व तपास अधिकारी यावी साक्ष महत्वाची राहिली. विशेष बाब म्हणजे सदर सत्र खटल्यामध्ये सर्व साक्षीदाराने सरकार पक्षास मदत केलेली आहे व पिडीतेला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पिडीतेने आरोपीसोबत संमतीने शारिरीक संबंध ठेवले होते ही बाब वि. न्यायालयाचे निदर्शनास आल्यामुळे आरोपीला वि. न्यायालयाने भा.दं.वि.चे कलम 376 (2) (n).506 4 अॅटॉसिटी अॅक्टचे कलम 3(2) (va). 3(1) (w) (i). 3(1) (w) (ii) नुसार निर्दोष मुक्त केलेले आहे. तर भा.दं.विचे कलम 324 व 342 नुसार दोषी ठरवून भा.दं. विचे कलम 324 नुसार 2 वर्ष सक्त म 20 हजार रुपये दंड तर भा.दं.वि चे कलम 342 नुसार 6 महिने सक्त मजूरी व १ हजार दंड वरील दोन्ही दंड न भरल्यास 3 महिने व 1 महिना अनुकमे साध्या कारावासाची शिक्षा अशा प्रकारे शिक्षा सुनावलेली आहे. एकंदरीत सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल वसंत लक्ष्मण भटकर यांनी आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्या दृष्टीकोनातून प्रभावी युक्तीवाद सर्व शिक्षा आरोपीस एकत्रीत भोगावयाचे आहेत तर सदरचा खटला यशस्वी होण्यासाठी पो.नि. सचिन चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते तसेच कोर्ट पैरवी पो.हे.कॉ. नंदाराम इंगळे व अशोक गायकवाड यांनी पुर्णपणे सहकार्य केले.