spot_img

मराठा नेतृत्व जरांगे पाटील बुलढाण्यात !

बुलढाणा, 22 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : मराठा आरक्षणासाठी संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे आणि जीवाचे रान पेटविणारे ‘मनोज जरांगे पाटील’ बुलढाण्यात आले होते.. येथील कृष्णा हॉटेलच्या छत्रपति टॉवरवर ते जवळपास एक तास थांबलेही.. परंतु त्यांच्या दौर्‍याबाबत कमालीची गुप्तता ठेवण्यात आली होती.. कुणालाही याबाबत कळविण्यात आले नव्हते. त्यांनी खूप मोजक्या निष्ठावंत मराठा आंदोलकांशी चर्चा केली आणि ते निघून गेले.. पण गुड इव्हिनिंग सिटीने त्यांना गाठून त्यांच्याशी अनौपचारिक बातचीत केलीच.. त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ या आगामी चित्रपटाविषयीच माहिती दिली. आरक्षण, राजकारण किंवा इतर कुठल्याही सामाजिक मुद्यावर ते बोलते नाहीत.. मागील वेळेस जिजाऊ जन्मोत्सवाच्या वेळी ते सिंदखेडराजा येथे येवून गेले होते.. तेव्हा सगळ्यांना भेटले होते. परंतु आजच्या त्यांच्या दौर्‍याविषयी एव्हढी काय गुप्तता ठेवण्यात आली? मनोज जरांगे पाटील आले तर त्यांची एखादी सभा का नाही घेतली ? ते बाकीविषयावर का नाही बोलले? असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असतील. तर त्याचं उत्तर एकच आहे की, आपण जे समजताय, ते मनोज जरांगे पाटील बुलढाणा शहरात आले नव्हते. तर जरांगे पाटील यांच्यावर आधारित ‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका साकारणारे रोहन पाटील आणि त्यांची संपूर्ण टिम बुलढाण्यात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येवून गेले. अभिनेता रोहन पाटील पूर्णतः मनोज जरांगे पाटील यांच्या गेट-अपमध्ये असल्यामुळे ज्यांनीही त्यांना बघितले, त्यांना रोहन पाटील यांच्यात मनोज जरांगे पाटीलच आढळून आले. तसाच गळ्यात दुपट्टा, सडपातळ बांधा, मधून भांग, सावळा चेहरा, लांबसडक हात आणि आवाजात जरब, या वर्णनाची व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत. रोहन पाटील आज हुबेहुब मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसत होते.
मराठा आरक्षणाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 21 जुन रोजी राज्यभरात प्रदर्शीत होणार आहे. आज चित्रपटाची टीम बुलढाण्यात दाखल झाली होती. त्या चित्रपटाच्या संर्दाभात हॉटेल कृष्णा येथे आज पत्रकार परिषद अयोजित करण्यात आली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील यांची भुमिका साकरणारे अभिनेते रोहन पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधतांना सांगितले की, मनोज जरांगे पाटील यांची भुमिका साकरणे हे प्रथमतः कठीण वाटत होते. परंतू समजातून ज्याप्रमाणे लोकांचा पाठींबा मिळत गेला तेव्हा मोठया आनंदाने ही भुमिका साकरणे सहज शक्य झाले. मनोज जरांगे पाटील हे घरा घरात पोहचविण्याचे सर्वात महत्वाचे माध्यम म्हणजे चित्रपट आहे. त्या चित्रपटाच्या माध्यमातूनच मनोज जरांगे पाटील यांचा 20 वर्षाचा संर्घष लोकांसमोर पोहचवू शकेल. अभिनेता म्हणून नव्हे तर माणूस म्हणून ही भुमिका साकरली. यावेळी चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक गोर्वधन दोलताडे आंतरवली सराटीत काय घडले त्यासंदर्भात सुध्दा माहिती चित्रपटात देण्यात आली आहे. त्यांच्या पहिल्या आंदोलनापासून तर आतापर्यंतचा जीवनप्रवास यामध्ये उलगडला आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांचा मुलगा शिवराज याच्या भुमिकेत बालकलाकार श्रीनिवास पोफळे, अंतरवली सराटीतील मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी शाम तारक, सुरेश लहाने, राजेश देशमुख तसेच बुलढाणा येथील मराठा क्रांती मोर्चाचे राजेश हेलगे, राजेश्‍वर उबरहंडे, प्रा.सुनिल सपकाळ, प्रा.अनिल रिंढे, सुजित देशमुख, अ‍ॅड.राज देवकर, सागर काळवाघे, निलेश हरकल, गौरव देशमुख, शैलेश खेडकर, अनिकेत गवळी आदिंची उपस्थिती होती. 

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत