spot_img

सर्व शाळांनी आनापान साधना कार्यक्रम राबविण्याचे जि.प. शिक्षण विभागाचे आदेश

बुलढाणा, ११ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : सर्व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती यांनी आपल्या अधिनस्त सर्व शासकीय व खाजगी शाळांमध्ये मित्र उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे आना- पान सराव घेऊन केलेल्या कारवाईचा अहवाल दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जिल्हा मित्र समन्वयक गणेश वसंतराव मोरे यांच्याकडे सादर करावे असा लेखी आदेश जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक बी. आर. खरात व जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक ए.बी. आकाळ यांनी संयुक्त सहीने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. यामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या इयत्ता पाचवी ते दहावी/बारावीच्या वर्गाकरिता मित्र उपक्रमांतर्गत आनापान साधना वर्ग सुरू करणे सुलभ व्हावे याकरिता आनापान साधनेचा शाळेमध्ये नियमित सराव करण्यासाठी पहिल्या तासिकेमधील पाच मिनिटे व मधल्या दीर्घकालीन सुट्टी मधील पाच मिनिटे असा एकूण दहा मिनिटांचा वेळ कमी करून सदर दहा मिनिटांचा वेळ साधनेसाठी शालेय वेळापत्रकात उपलब्ध करून देण्यात यावा. त्यानंतर सदर दहा मिनिटे परिपाठानंतर लगेचच आणापानासाठी उपयोगात आणावे असेही आदेशात पुढे म्हटले आहे. या आदेशानुसार सर्व सूचना विचारात घेऊन त्यानुसार प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने मित्र उपक्रमात सातत्यरित्या सुरू राहील यासाठी उपक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा व पाठपुरावा पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत (मुख्याध्यापक, प्राचार्य, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, विषय साधन व्यक्ती, आणि विशेष साधन व्यक्ती) करण्यात यावा. या सोबत माहिती पाठवण्याकरिता एक नमुना सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यामध्ये तालुका केंद्र, यु डी आय क्रमांक, शाळेचे नांव, पटसंख्या मूल व मुली, आनापान सराव सुरू दिनांक इत्यादीचा समावेश आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत