spot_img

तालुक्यातील गावोगावी तयार झाले योजनांचे दलाल

बुलढाणा, १४ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या लाडकी बहीण या योजनेसह अन्य शासकीययोजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गावागावांत दलाल निर्माण झाले असून, असे दलाल लाभार्थ्यांना हेरून त्यांचेकडून हजारो रूपये उकळत असल्याचे शहरासह ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. शासनाने जाहीर केल्या महिलांकरिता प्रतिमाह १५०० रूपये या लाडकी बहीण या योजनेसह संजय गांधी योजना, संजय निर- ाधार कामगार कल्याण विभागाची अर्थ सहाय्य योजना, रेशनकार्ड तसेच कृषी विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, पंचायत समिती अंतर्गत घरकुल योजना, शेळी, मेंढी, म्हशीवाटप योजना आदीसह शासनाच्या विविध विभागाच्यावतीने सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी योजना राबविण्यात येतात. परंतु वरील योजनांचा लाभ मिळवून देतो असे सांगून शहरासह ग्रामीण भागात नवीनच टोळी निर्माण झाली असून असे दलाल गावागावांतील परिचित गरजवंत व अज्ञानी लाभार्थ्यांना हेरून योजनेचा लाभ मिळून देण्याची ग्यारंटी घेऊन त्यांच्याकडून हजारो रूपये उकळत आहेत. स्वतः जाऊन कटकटी करण्यापेक्षा काही लाभार्थी सुध्दा दलालाच्या कृतीला बळी पडून हजारो रूपये त्यांना देतात. लाभार्थ्यांकडून गोळा केलेले अर्ज हे दलाल शासकीय कार्यालयातील संबंधीताशी संधान बांधून कार्यालयात सादर करतात. यातील काहींना प्रत्यक्ष योजनेचा लाभ मिळतो, काहींना नाकारला कल्याण जातो. कामगार कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत तर दिवसा दरोडेखोरी केली जात आहे. अधिकृत सुध्दा नाममात्र असताना या शृखंलेत कार्यरत दलालांकडून लाभार्थ्यांची मोठी आर्थिक लूट केली जात आहे. प्रत्येक लाभार्थ्याकडून लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून १००० ते २००० रूपयांपर्यंत पैसे उकळले जात आहेत. दलाल गावागावात निर्माण झाले असून ते गावखेड्यातून दररोज बुलढाणा येथील महसूल कार्यालय तथा पंचायत समिती कार्यालयात घिरट्या घालताना दिसून येतात.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत