श्रीमती शितल घोगरे यांच्या नेतृत्वात एसीबीची धडाकेबाज कारवाई
बुलढाणा, २१ जुलै (गुड इव्हिनिंग सिटी/अजय काकडे) गेल्या सहा महिन्यात एसीबीच्या माध्यमातून जिल्ह्यात १० कारवाया करण्यात आल्या आहे. एसीबीच्या पोलिस उपअधिक्षक श्रीमती शितल घोगरे यांच्या नेतृत्वात धडाकेबाज कारवाई करण्यात येत आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचे पगार मिळत असतानाही लाच घेतल्याच्या घटना दररोज उघडकीस येतात. अशा लाचखोरांवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जाते. बुलढाणा जिल्ह्यात जानेवारी ते जून या कालावधीत १० कारवाया करण्यात आल्या असून १६ ला- चखोरांना अटक करण्यात एसीबीला यश आले आहे. सरकारी किंवा निमशासकीय कर्मचाऱ्यांनी कोणत्याही शासकीय कामासाठी नागरिकांकडून पैशाची मागणी केल्यास त्यांनी एसीबीकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात लाच- लूचपत प्रतिबंधक विभागाने १० सापळा रचून १६ जणांना अटक केली आहे. यात महसूल विभागातील पाच आणि ग्रामीण पाणीप- रवठा विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तसेच कंत्राटी पद्धतीवर नियुक्त नगरपरिषद कार्यालयातील दोन कर्मचारी, जिल्हा परिषद श्रेणी-३ मधील दोन कर्मचारी, वनविभाग संवर्ग-१ मधील एक व अन्य एक अशा एकूण १६ शासकीय कर्मचाऱ्यांवर १० कारवाई करण्यात आली. एसीबीच्या वतीने अटक करण्यात आली आहे. एसीबीने आता केलेल्या कारवाईत मालमत्ता जप्त करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. तसेच अद्यापपर्यंत लाच घेणाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आलेला नाही. यामध्ये अमरावती विभागातील अकोल्यातील एका प्रकरणाचा समावेश आहे. तर बुलढाणा जिल्ह्यात मालमत्ता जप्तीसंदर्भातील एकही प्रकरण नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक शितल घोगरे यांच्या नेतृत्व- ाखाली एसीबीने सहा महिन्यांत ९ सापळे यशस्वी केले आहेत. यामध्ये फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी दोन कारवाया करण्यात आल्या आहे. महसूल विभागात लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आतापर्यंत केलेल्या कारवाईवरून महसूल विभाग लाचखोरीत अव्वल असल्याचे स्पष्ट झाले आहे. महसूल विभागात आतापर्यंत तीन कारवाया झाल्या असून त्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एक श्रेणी-१ अधिकारी, ३ श्रेणी-३ अधिकारी आणि इतर एक अधिकारी या कारवाईत समावेश आहे.
लाच मागितल्यास कारवाई अटळ..

बुलढाणा जिल्ह्यात जानेवारी ते जून या कालावधीत एकूण १० सापळे यशस्वी झाले आहेत. यामध्ये १६ जणांना अटक करण्यात आली आहे. लाच घेणाऱ्यांवर एसीबीची कारवाई सुरूच राहणार आहे. जनतेला आवाहन करण्यात येते की, शासकीय कामाकरिता शुल्काशिवाय लाच मागणी केल्यास नगरिकांनी एसीबीला संपर्क करावा. तक्रारदाराचे नाव व माहिती गोपनीय ठेवण्यात येईल. यासाठी एसबीच्या टोल फ्री क्रमांक १०६४ तसेच दुरध्वनी क्रमांक ०७२६२२४२५४८ यावर संपर्क साधावा.
– श्रीमती शितल घोगरे
पोलिस उपअधिक्षक, एसीबी बुलढाणा