पुणे जिल्हा पोलिसांकडून रोकडसह अटक
बुलडाणा, 25 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः नियत फिरली की माणूस पद, प्रतिष्ठा सगळं काही विसरतो. माजी नगराध्यक्षा सौ. उज्ज्वलाताई काळवाघे यांचे पति बंडू उर्फ गजानन काळवाघे यांना दरोड्याच्या गुन्ह्यात पुणे जिल्ह्यातील यवत पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे घराशेजारीच राहणार्या डांगे कुटूंबाकडून 50 लाख रुपयांची रोकड बंडू काळवाघेने चाकूचा धाक दाखवून लुटली होती.
गुड इव्हिनिंग सिटीला यवत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राहू – चौफुला (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील हॉटेल रघुनंदन येथे जेवणासाठी थांबलेल्या शरद मधुकर डांगे (वय-76 वर्ष), त्यांची सून आणि व्याही (राहणार चैतन्यवाडी, जि. बुलढाणा) या कुटुंबीयाला चाकूचा दाखवून त्यांच्यासोबत असलेल्या बंडू उर्फ गजानन काळवाघे (वय-40 वर्ष) रा. चैतन्यवाडी, जि. बुलढाणा याने जबरदस्तीने चाकूचा धाक दाखवून चारचाकी गाडीतील 45 लाख रुपयांची बॅगेमधील रोकड (ता. 23) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हस्तगत करून चौफुला केडगाव मार्गे शिरूरच्या दिशेने पळून गेला. डांगे कुटुंब कर्नाटक येथून पुण्याच्या दिशेने चालले होते. दरम्यान चौफुला येथे जेवणासाठी थांबले असताना हा भयानक प्रकार घडला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि यवत पोलिसांनी नाकेबंदी करत अत्यंत शिताफीने सापळा रुचून पुणे-नगर रोडवरील पीर फाटा (न्हावरा फाटा) येथे आरोपी बंडू उर्फ गजानन काळवाघे (वय-40 वर्ष) रा. चैतन्यवाडी, जि. बुलढाणा याला 45 लाख रुपयांच्या रोकडसह ताब्यात घेतले.
पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील अधिक तपासासाठी न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शरद डांगे यांनी यवत पोलिसात फिर्याद दिली असून फिर्यादीमधील माहितीनुसार शरद डांगे यांच्या सुनबाईंच्या वडिलांची (व्याही) कर्नाटक राज्यातील इंडी गावात जमीन होती. सदर जमीन विक्रीचा व्यवहार आरोपी बंडू उर्फ गजानन काळवाघे याने मध्यस्थी करून वीरभद्र कट्टी, राहणार इंडी, राज्य कर्नाटक यांच्याशी जमवून दिला होता. एकुण 18 एकर क्षेत्राच्या व्यवहारापोटी 50 लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आला होता. पोलीसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील अधिक तपासासाठी न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शरद डांगे यांनी यवत पोलिसात फिर्याद दिली असून फिर्यादीमधील माहितीनुसार शरद डांगे याच्या सुनबाईंच्या वडिलांची (व्याही) कर्नाटक राज्यातील इंडी गावात जमीन होती. सदर जमीन विक्रीचा व्यवहार आरोपी बंडू उर्फ गजानन काळवाघेे याने मध्यस्थी करून वीरभद्र कट्टी, राहणार इंडी, राज्य कर्नाटक यांच्याशी जमवून दिला होता एकुण 18 एकर क्षेत्राच्या व्यवहारापोटी 50 लाख रुपये अॅडव्हान्स देण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलिसांच्या धडक कारवाईमुळे आरोपीला शिताफीने पकडण्यात आले. त्यामुळेच आम्हाला आमची रक्कम परत मिळाली असे डांगे कुटुंबीयांनी सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, स्थानिक पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, अमित पाटील, प्रदीप चौधरी, प्रवीण संपांगे, अभिजीत पवार, तुषार पंदारे, राजू मोमीन जनार्दन शेळके, संजव जाधव आदी पोलीस पथकांच्या मदतीने कारवाई करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे करत आहे.