बुलढाणा, ६ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : शहरातील मोकाट जनावरे मुख्य रस्त्यावर बसत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्त्यामध्ये हे मोकाट जनावरे उभे राहत असल्याने अपघात होण्यास कारणीभूत ठरु नये, ही गंभीरता लक्षात घेऊन बुलडाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक गणेश पांडे यांनी शहरात मोकाट जनावरे फिरत आहे. त्या जनावरांच्या मालकाला आहवान केले होते. त्यावरही जनावरांच्या मालकांनी याकडे दुर्लक्ष केले. वेळोवेळी सुचना देऊनही मालक त्यांचे जनावरे घरी घेऊन जात नसल्याने नगर पालिकेने मोकाट जनावरे पकडण्यासाठी बुलढाणा, ६ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : शहरातील मोकाट निविदा काढली. त्यावर नगर पालिकेने कंत्राटदार यांना जनावर पकडण्यासाठी कंत्राट दिले आहे. यावर त्यांच्या कर्मचारी यांनी आज ५ ऑगस्ट रोजी मोहिम सुरू केली आहे. शहरातील मुख्य रस्ते, तसेच वर्दळीच्या ठिक ठिकाणी हे मोकाट जनावरे एकत्र येऊन उभे राहतात. यामुळे मोटार सायकल, चारचाकी वाहन तसेच पायी चालणाऱ्या माणसाला याचा त्रास होतांना दिसत आहे. जनावरे पकडण्यासाठी कंत्राटदार यांचे कर्मचारी यांनी आजपासून सुरुवात केली आहे. त्यांनी शहरातील जयस्तंभ चौक, संगम चौक, कारंजा जे मोकाट जनावरे पकडल्या जाईल ते सर्व जनावरे गोरक्षण मध्ये जमा करण्यात येणार आहे, तसेच यावर जे काही वैरणचा खर्च येईल ते मोकाट जनावरांच्या मालकाला द्यावा, लागेल. सोबतच त्यांना नगर पालिकेचा २ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. – गणेश पांडे, मुख्याधिकारी न.प. बुलढाणा चौक, चिंचोले चौक, बसस्टॅण्ड परिसर, मलकापूर रोड आदी ठिकाणी ही मोहीम राबवून जना- वरे पकडून गोरक्षण येथे जमा केली जाणार आहे.
जे मोकाट जनावरे पकडल्या जाईल ते सर्व जनावरे गोरक्षण मध्ये जमा करण्यात येणार आहे, तसेच यावर जे काही वैरणचा खर्च येईल ते मोकाट जनावरांच्या मालकाला द्यावा, लागेल. सोबतच त्यांना नगर पालिकेचा २ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

– गणेश पांडे, मुख्याधिकारी न.प. बुलढाणा