बुलढाणा,13 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी): बुलढाणा पोलिस अधीक्षक सुनिल कडासणे हे 15 दिवसांनी सेवानिवृत्त होणार. येणाऱ्या 31 ऑगस्ट रोजी ते सेवानिवृत्त होत आहे.सुनिल कडासणे यांच्या सेवानिवृत्ती नंतर कोण येणार याची उत्सुकता लागली आहे. आम्ही तुमची उत्सुकता ताणून धरणाचर नाहीत.. गुड इव्हिनिंग सिटी त्या नियुक्तीची सर्वात पहिली ब्रेकिंग आपल्याला देत आहे. पण त्यांच्या जागी येणारे नविन पोलिस अधीक्षक हे सध्या नागपूरला कार्यरत आहेत. ते तेथून बुलढाण्याच्या पोलिस अधीक्षक पदाची धुरा सांभाळणार आहेत. बुलढाण्याचे नवीन हे ध्या पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेषण नागपूर या पदावर आहेत. त्यांचे नाव विश्व पानसरे आहे. विश्व पानसरे हे या आधी गोंदियाचे पोलिस अधीक्षक राहिले आहेत. विश्व पानसरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाचे सह सचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने पत्र निर्गमित करण्यात आले आहे. सुनिल कडासणे यांची एका वर्षापुर्वीच बुलढाणा पोलिस अधीक्षक पदी नियुक्ती झाली होती. त्यांची कारकीर्द शांतेत जात आहे.