बुलढाणा, 29 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : अल्पवयीन तरूणीला पळवून नेवून तिचे लैंगिक शोषण करणार्या आरोपीला 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आज विशेष न्यायाधीश, विशेष न्यायालय, बुलढाणा आर. एन. मेहरे यांनी या महत्त्वपूर्ण सत्र खटल्यामध्ये निकाल देवून आरोपी मनोज उत्तम डोंगरे वय वर्षे 23 याला भादंविचे कलम 354 ड, 363, 366, 376(2) (जे) (एन) व पोक्सो अॅक्टचे कलम 6, 10 व 12 नुसार दोषी ठरवून पोक्सो अॅक्टचे कलम 6 नुसार 20 वर्षे सश्रम कारावास व पाच हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिने अधिकची शिक्षा, भादंविचे कलम 363 नुसार पाच वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अधिकची शिक्षा व भादविचे कलम 366 नुसार पाच वर्षे सश्रम कारावास व एक हजार रूपये दंड, दंड न भरल्यास एक महिना अधिकची शिक्षा तर पोक्सो अॅक्टचे कलम 6 मध्ये शिक्षा दिलेली असल्यामुळे भादविचे कलम 354 ड व 376 (2) (जे) (एन) मध्ये वेगळी शिक्षा दिलेली नाही. तर दंड रक्कम रूपये 7 हजार पैकी 5 हजार रूपये पिडीतेला देण्याचा आदेश केलेला आहे. पोक्सो अॅक्टचे कलम 6 नुसार 20 वर्षे शिक्षा दिलेली असल्यामुळे सर्व शिक्षा आरोपीस एकत्रित भोगावयाच्या आहेत. विशेष सरकारी वकील अॅड. वसंत भटकर यांनी केलेला युक्तीवाद आरोपीला अधिकाधिक शिक्षा मिळवून देण्यात महत्वाचा ठरला.
थोडक्यात हकीकत अशी आहे की, पो.स्टे. देउळगांव राजा अंतर्गत उंबरखेड येथे दिनांक 04 मार्च 2019 रोजी आरोपी मनोज उत्तम डोंगरे वय 23 वर्षे हयाने पिडीत मुलगी वय 15 वर्षे 10 महिने हिस पळवून नेवून तिला जालन्याच्या जवळ नेले व त्यानंतर तेथून एका ट्रक मध्ये औरंगाबाद पर्यंत नेले. औरंगाबाद येथे पोहचल्यानंतर दोघेही औरंगाबाद रेल्वेस्टेशन पर्यंत पायी चालत जावून सांयकाळी 8 वाजता सुरत येथे जाणार्या रेल्वेत बसून दिनांक 5 मार्च 2019 पासून 20 मे 2019 पर्यंत सुरत येथे एक रूमवर राहून अज्ञान पिडीतेसोबत जबरदस्तीने संभोग केला व तिचेसोबत लैंगिक अत्याचार केला. दिनांक 4 मार्च 2019 रोजी मुलगी रात्रीच्या वेळेस घरात मिळून न आल्यामुळे पिडीतेच्या आईवडिलांनी आरोपी मनोज वर संशय व्यक्त करून पो.स्टे. देउळगांव राजा येथे तकार दिली होती. सदर तकारीनुसार आरोपी मनोज विरुध्द भादविचे कलम 354 ड. 363 व पोक्सो अॅक्टचे कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पो. स्टे. देउळगांव राजा यांनी सखोल तपास करून आरोपी व पिडीतेला दिनांक 20 मे 2019 रोजी पो.स्टे. देउळगांव राजा येथे आणले होते व त्यानंतर दि. 21 मे 2019 रोजी पिडीतेने दिलेल्या जबाबावरून वरील गुन्हयामध्ये भादविचे कलम 366, 376 (2) (जे) (एन) व पोक्सो अॅक्टचे कलम व 12 समाविष्ट करण्यात आले होते व साक्षदारांचे जाबजबाब नोंदविल्यानंतर, पिडीतेची व आरोपीची वैद्यकिय तपासणी झाल्यानंतर, घटनास्थळ व जप्तीपंचनामा झाल्यानंतर तपासाअंती आरोपीविरूध्द विशेष न्यायालय बुलढाणा येथे आरोपीविरूध्द दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर वि. विशेष न्यायालयाने भादंविचे कलम 354 ड, 363, 366, 376 (2)(जे) (एन) व पोक्सो अॅक्टचे कलम 6, 10 व 12 नुसार दोषारोप ठेवण्यात आला होता. त्यानुसार आरोपीविरूध्द दोष सिध्द होण्याचे दृष्टीकोनातून सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अॅड. वसंत भटकर हयांनी एकूण 9 साक्षीदार तपासले त्यामध्ये पिडीता, पिडीतेवे आईवडील, घटनास्थळ व जप्तीपंच, वैद्यकिय अधिकारी डॉ. वैशाली माटे व तपास अधिकारी तसेच विशेष करून पिडीतेचे वय सिध्द होण्याचे दृष्टीकोनातून पिडीतेने ज्या शाळेत शिक्षण घेतले तेथील कर्मचारी इत्यादींची साक्ष महत्वाची ठरली. तसेच आरोपीस शिक्षा होण्याच्या दृष्टीकोनातून रासायनिक प्रयोगशाळेतून प्राप्त झालेला अहवालसुध्दा महत्वाचा ठरला. एकंदरीत आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा सरकारी वकिल श्री. वसंत भटकर यांनी उपलब्ध पुराव्याच्या आधारे प्रभावी युक्तीवाद केला. सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरिक्षक उमेश बालाजी भोसले व प्रमोद दत्तात्रय भातनाते यांनी केला तर कोर्ट पैरवी म्हणून पो. हेड कॉ. सुनिल साळवे यांनी मदत केली