बुलढाणा, २९ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या सोशल मिडीया आकाऊंटवरून पोलिस गाडी धुतांनाचा एक व्हिडीओ पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर एक पोलीस कर्मचारी त्यांची गाडी धूत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.. माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याच्या फेसबुक अकाऊंट वरून तो व्हिडिओ पोस्ट केला असून कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल केला आहे. महाराष्ट्राचे विधान परिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत पोस्ट केली आहे. बुलडाणा येथील जयस्तंभ चौकात आमदार संजय गायकवाड यांचे संपर्क कार्यालय आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेसोबत गेल्यानंतर आमदार गायकवाड यांच्यासह शिंदेच्या दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. ती सुरक्षा अद्यापही कायम आहे. दरम्यान आ. गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेर त्यांचे वाहन धुत असल्याचा एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट केला आहे. हा पोलीस कर्मचारी नेमका कोण हे व्हिडिओ स्पष्ट दिसत नाही मात्र आमदार गायकवाड यांच्या सुर- क्षेसाठी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याऱ्यांपैकीच तो एक असावा असा अंदाज आहे. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद असलेली महाराष्ट्र पोलीस यंत्रणा आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे की आमदारांच्या गाड्या धुण्यासाठी? असा सवाल हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याऱ्यांच्या या वर्तनावर एसपी सुनील कडासने सेवानिवृत्ती पुर्वी काय कारवाई करणार? का या त्यांच्या भुमिकेकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.