अजित पवारांनी सहाव्यांदा घेतील उमुख्यमंत्रीपदाची शपथ
मुंबई, ५ डिसेंबर (वृत्तसंस्था): महाराष्ट्रातील निवडणूक निकालानंतर १३ दिवसांनी आज नवीन सरकार स्थापन होणार आहे. आज सायंकाळी ५.३० वाजता आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस तिसन्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्याशिवाय शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सुध्दा मोठ्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून उपमुख्यमंत्री होणारे शिंदे हे दुसरे नेते आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेते या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याशिवाय भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. याशिवाय देशभरातील ४०० संत- मुनी सहभागी आहेत. महाराष्ट्रातील निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला लागला. महायुती म्हणजेच भाजप-शिवसेना शिंदे-राष्ट्रवादी पवार यांना २३० जागांचे प्रचंड बहुनत मिळाले आहे. पाच वर्षांनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा आले आहेत. त्यांचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर संपन्न होणार आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. शिंदेंच्या शपथविधीबद्दल निर्माण झालेला सस्पेन्त अखेर संपला. शपथविधी सोहळ्याला अवघे काही तात राहिलेले असताना शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दर्शवली. आमदारांकडून गेल्या ३ दिवसांपासून शिंदेंची मनधरणी सुरू होती. त्यांच्या प्रयत्नांना अखेर आज यश आलं. शिंदेंनी उपमुख्यमंत्री होण्याची तयारी दर्शवण्यामागे तीन महत्त्वाची कारणे आहेत. शिंदेंनी स्वतः उपमुख्यमंत्री न होता अन्य कोणत्या नेत्याकडे या पदाची जबाबदारी दिली असती, तर मग अन्य नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा जागृत झाल्या असत्या. शिंदे यांचे पुत्र श्रीकांत यांचं नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत होतं. याशिवाय शंभुराज देसाई, उदय सामंत यांचीही नावं चर्चेत राहिली. श्रीकांत यांची निवड केली असती, तर घराणेशाहीची टीका झाली असती. कारण ते आधीच लोकसभेचे खासदार आहेत. अन्य एखाद्या नेत्याकडे जबाबदारी सोपवली असती, तर अन्य नेते नाराज होण्याची शक्यता होती. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या इतिहासातलं सर्वात मोठं बह केलं, त्यांना ४० आमदारांनी साथ दिली. त्या बंडानं ते पक्षाचे निर्विवाद नेते झाले. मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी पक्षावरील पकड आणखी मजबूत केली. सध्या तरी त्यांच्या तोडीचा नेता पक्षात नाही. पण अन्य कोणाकडे उपमुख्यमंत्रिपद दिलं असतं, तर मग पक्षात आणखी एक सत्ताकेंद्र तयार झालं असतं. त्यामुळे शिंदेंच्या व्र्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता होती.