ठाणेदार संग्राम पाटील की नजर से बचना मुश्किल ही नहीं नाममुकिन हैं
चिखली, 7 डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : अनेकवेळा मोबाईल चोरी झाल्यानंतर नागरिक हे मोबाईलची तक्रार करण्यास पुढे येत नाही. याचे कारण म्हणजे की, आपला मोबाईल आपल्याला मिळेल किंवा नाही याची शाश्वती नसते पण चिखली पोलिस स्टेशन याला अपवाद ठरल्याचे दिसते. चिखली पोलिस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आता पर्यंत शेकडो मोबाईल ताब्यात घेत मुळ मालकांकडे स्वाधीन केले आहे. पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या काही काळापासून मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. या पथकाने एकूण 16 मोबाईल जप्त करून त्यांची किंमत सुमारे 2 लाख 23 हजार रुपये असल्याचे आढळून आले.

ठाणेदार संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे विविध ठिकाणांवर छापे टाकून हे मोबाईल जप्त केले. जप्त केलेल्या मोबाइलमध्ये कंपन्यांचे मोबाईल समाविष्ट आहेत. पोलिसांनी जप्त केलेले हे सर्व मोबाइल त्यांचे मूळ मालक शोधून त्यांना परत केले आहेत. यामुळे चिखली परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे. या यशस्वी कारवाईमागे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बि.बी.महामुणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर पाटील यांचे मार्गदर्शन आहे. पोलिसांची कारवाई अशीच सुरू राहणार असून, गुन्हेगारांना शोधून कायद्याच्या कठोर प्रतारणात आणण्याचे काम पोलीस करत राहतील, असे ठाणेदार संग्राम पाटील यांनी सांगितले. सदरची कारवाई विजय किटे, सुनिल राजपूत, महिला पोलिस अंमलदार रूपाली ऊगले यांच्या पथकांने कारवाई केली.